लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 15 मार्च 2018
तालुकास्तरावर कृषी महोत्सव भरवण्याचा मानस
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले : कृषि महोत्सवाचा समारोप
सोलापूर, दि. 15 : शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी, उत्पादित मालाला बाजारपेठ व योग्य भाव मिळण्यासाठी कृषि महोत्सवांची भूमिका महत्त्वाची आहे. तालुका स्तरावर कृषि महोत्सव आयोजित केल्यास त्याचा शेतकऱ्यांना लाभ होईल. यासाठी येत्या काळात कृषि विभागामार्फत तालुका तालुकास्तरावर असे महोत्सव आयोजित करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी आज केले.
कृषि विभागामार्फत होम मैदान येथे 11 ते 15 मार्च 2018 या कालावधीत आयोजित केलेल्या कृषि महोत्सवाचा समारोप जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमंत पाटोळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बसवराज बिराजदार, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, प्रकल्प व्यवस्थापक रवींद्र माने, सोलापूर प्रोड्यूसर कंपनीचे संचालक हणमंतराव कुलकर्णी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, कृषि महोत्सव शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारा उपक्रम आहे. अशा उपक्रमातून शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञानाची माहिती अवगत होते. पीक पद्धती, हवामान, माती परीक्षण, खतांचा वापर यांची माहिती महोत्सवात आयोजित केलेल्या विविध सत्रातून शेतकऱ्यांना सहजतेने मिळते. यामुळे असे महोत्सव तालुकास्तरास झाल्यास ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्याचा निश्चितच लाभ होईल. कृषि विभागाच्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना एका छताखाली मिळेल.
सोलापूर जिल्हा कृषि महोत्सवास अपेक्षेपेक्षाही जास्त चांगला प्रतिसाद मिळाला. सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांनी महोत्सवाचे नियोजन चांगल्या प्रकारे केले, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले.
प्रारंभी विजयकुमार बरबडे यांनी कृषि महोत्सवातील उपक्रमांची माहिती दिली. महोत्सवात लावण्यात आलेल्या 250 स्टॉलवर सुमारे 35 लाखांची उलाढाल झाली. तर पाच दिवसांत तब्बल एक लाख शेतकरी तसेच सामान्य नागरिकांनी महोत्सवास भेट दिल्याची माहिती त्यांनी दिली.
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, लोकमंगल उद्योग समूह, वेंकीज इंडिया, एनटीपीसी व कृषि उत्पन्न बाजार समिती यांनी महोत्सवाचे प्रायोजकत्व स्वीकारल्याबद्दल विशेष सत्कार करण्यातआला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर जोशी यांनी केले तर आभार कल्पक चाटी यांनी मानले.
****
आयटीआय उमेदवारांसाठी
20 मार्च रोजी भरती मेळावा
सोलापूर, दि. 15 :- आयटीआय उत्तीण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 20 मार्च 2018 रोजी सकाळी 10.00 वाजता शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थेत भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या भरती मेळाव्यास जिल्ह्यातील आस्थापना व पात्र उमेदवारांनी उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (0217-2341524) येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य, एस. एम. मुसळे यांनी केले आहे.
*****
गहू व तांदूळ
नियतन मंजूर
सोलापूर दि 15 :- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी माहे एप्रिल 2018 साठी गहू व तांदूळाचे नियतन (अन्नधान्य) मंजूर झाले आहे. यामध्ये अंत्योदय अन्नयोजनेंतर्गत प्रतिकार्ड लाभार्थ्यांना 20 किलो गहू तर 15 किलो तांदूळ तर प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांसाठी प्रति लाभार्थी 3 किलो गहू तर 2 किलो तांदूळ नियतन मंजूर करण्यात आले आहे. यानुसार अंत्योदय अन्न योजनेसाठी 1047.80 क्विंटल गहू व 785.85 क्विंटल तांदूळ आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थीसाठी 12386.70 क्विंटल गहू व 8257.80 क्विंटल तांदळाचे नियतन मंजूर असल्याचे, अन्नधान्य वितरण अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी कळविले आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments