श्री हिंगुलांबिका देवीचा प्रकट दिन उत्साहात...शोभायात्रेने वेधले लक्ष!

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 15 मार्च 2018




सोलापूर, दि. 15 : समस्त भावसार समाजाची कुलदैवत श्री हिंगुलांबिका देवीचा प्रकट दिन गुरूवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  प्रकटदिनानिमित्त गणेश पेठ येथील श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात विविध कार्यक्रमांचेआयोजन करण्यात आले होते. हिंगुलांबिका मातेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेलाहोता.  

सकाळी 6 वाजता यजमान गिरीष वायचळ यांनी सपत्निक 21 फळ, पुष्पवृष्टी व अमृत अभिषेक करून देवीला वस्त्र अर्पण केले. त्यांच्या हस्ते अलंकार घालून देवीची महाआरती करण्यात आली.
त्यानंतर श्री हिंगुलांबिका देवीच्या शोभायात्रेचा प्रारंभ सकाळी 9 वाजता झाला. सुरूवातीला श्री हिंगुलांबिका देवीच्या खास बनवलेल्या मूर्तीचे पूजन समाजाचे ट्रस्टी किशोर कटारे, यल्लप्पा महिंद्रकर, दत्तात्रय पुकाळे, श्रीकांत अंबुरे, सुर्यकांत महिंद्रकर, विजय पुकाळे व आश्विन डोईजोडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर हिंगलाज ज्योत, ढोल ताशा, हालगी वाद्य, घोडेस्वार, लेझीम  पथक भगवा ध्वज पथक, गोंधळ गीत, दांडपट्टा व बँड अशा विविध प्रकारच्या पथकासह भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ही  शोभायात्रा विद्यानिकेतन प्रशाला, संयुक्त चौक, भावसार रोड, समाचार चौक, माणिक चौक येथे दाखल झाली.
माणिक चौक येथे महापौर शोभा बनशेट्टी, नगरसेवक डॉ. किरण  देशमुख, अमर पुदाले, नागेश भोगडे यांनी शोभायात्रेचे स्वागत करून देवीचे पूजन केले. त्यानंतर मधला मारूती, मंगळवार पेठ पोलिस चौकी, कुंभार वेस, कोंतम चौक मार्गे शोभायात्रा गणेश पेठ येथील देवी मंदिरात दुपारी 2 च्या सुमारास दाखल झाली. मार्गात समस्त देवी भक्तांनी शोभायात्रेचे स्वागत पुष्पवृष्टी, फटाक्यांची आतषबाजी व देवीचे पूजन केले. या शोभायात्रेत समाजातील आजी माजी पदाधिकारी, समाज बांधव मोठ्या संख्येने  उपस्थित झाले होते.
यानंतर कुंकुमार्चन, होमहवन, मंत्रपुष्पांजली आणि महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. यावेळी हिंगुलांबिका देवी  मंदिराच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी राजेश कटारे, किसन गर्जे, बाळासाहेब खमितकर, शुभम उत्तरकर, रोहित माळवदकर आदींनी परिश्रम घेतले.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments