लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 14 मार्च 2018
पंढरपूर:- राज्यशासनाच्यावतीने शेतकर्यांसाठी छ.शिवाजी महाराजांच्या नावावर शेतकरी कर्जमाफी योजना राबवले जात आहे. परंतू मार्च महिना निम्याहून अधिक संपत आला असतानाही अद्यापपर्यंत किती शेतकर्यांना या योजनेचा लाभ झाला आहे. हे कळेनासे झाले आहे. सदर योजना ही भुलभुलैय्या ठरत आहे. त्यामुळे याचा निषेध म्हणून संभाजी ब्रिगेडच्यावतीने सहा. निबंधकांना गाजर भेट देऊन आंदोलन करण्यात आले.
छ. शिवाजी महारज कृषी सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफी योजनेचा लाभ शासनाच्या व प्रशासनाच्या चुकीच्या धोरनामुळे मिळालेला कोणत्याही शेतकर्याला स्पष्ट पणे मिळालेला नाही. अनेकांच्या खात्यावरून माफ झालेले कर्ज परत गेले आहे. तर अनेक शेतकर्यांना एकून रकमेपेक्षा निम्मि रक्कमच कर्जमाफी म्हणून मिळाली आहे. सध्या मार्च एन्डींगचा तगादा बँकांकडून लावला जात आहे. त्यामुळे कर्जमाफी किती झाली? खाते निल झाले का? नसेल झाले तर किती व्याज भरायचे? असे अनेक सवाल उपस्थित करत शेतकरी बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. परंतू बँक अधिकार्यांकडून त्यांना उडवाउडवीचे उत्तरे देऊन बाहेरचा रस्ता दाखवला जात आहे. कर्जमाफी बद्दल कोणताही अधिकारी स्पष्ट माहिती देण्यास तयार होत नाही. त्यामुळे कर्जमाफ नसेल झाले तर पैसे भरतो परंतू एकदाचे खरे काय ते सांगा असा सूर शेतकर्यांमधून निघत आहे. कारण त्यांना नवे कर्ज मिळेनासे झाले असून बँकाही निल दाखला आणण्याचा घाट घालत आहे. कर्जमाफी हे सरकारने शेतकर्यांना दाखवलेले गाजर आहे. त्यामुळे याचा निषेध करीत बुधवारी संभाजी ब्रिगेडच्यावतीने सहा.निबंधक पि.टी.घुगे यांना गाजर भेट देऊन आंदोलन करण्यात आले. येत्या काही दिवसात कर्जमाफी चा स्पष्ट लाभ शेतकर्यांना मिळाला नाही तर सरकार विरोधात तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ब्रिेगेडच्यावतीने देण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे, तालुका अध्यक्ष बाळासाहेब बागल, शहराध्यक्ष स्वागत कदम, दादा बोडके, किरण कचरे, शंभू कदम, अमोल कुंभार, पप्पू देशमुख, बालाजी बागल, अनिकेत शिरसागर, संदिप सांवत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्य संखेने उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments