राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पद भरतीसाठी मुदतवाढ

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 14 मार्च 2018


सोलापूर, दि. 14 :-  भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र सोलापूरच्या वतीने 27 फेब्रुवारी 2018 रोजी राष्ट्रीय युवा स्वयंसेवक भरती करण्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ज्यामध्ये 10 वी पास असणाऱ्या व 1 एप्रिल 2018 रोजी 18 ते 29 दरम्यान वय असणाऱ्या व समाजकार्यात रस असणाऱ्या इच्छुक युवक, युवतींनी राष्ट्रीय युवा स्वयंसेवक रु. 5000 प्रति महिना मानधनावरील पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. सदर जाहिरातीत राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची मुदत दिनां. 13 मार्च 2018 पर्यंत होती. परंतु शासनाने सदर मुदतीत वाढ केली आहे. या पदासाठी आता 31 मार्च 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. पात्र उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नेहरू युवा केंद्राने केले आहे. अधिक माहितीसाठी 0217-2325433 या क्रमांकावर संपर्क साधावा.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments