चैत्री वारीनिमित्त जिल्ह्यात 22 तारखेपासून गोंगाट बंदी आदेश लागू

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 14 मार्च 2018


सोलापूर, दि. 14 :-  पंढरपूर येथे चैत्र वारी 22 मार्च ते 31 मार्च या कालावधीत भरत आहे. यादरम्यान जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा गोंगाट टाळण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात गोंगाटबंदीचा आदेश पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी दिला आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 38 पोट कलम 2 नुसार कोणत्याही साधनाचा आवाज करणे, कोणत्याही कामामुळे गोंगाट करणे (सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) याला मनाई करण्यात आली आहे. 22 ते 31 मार्च या कालावधीत जिल्ह्यात कुठेही वाद्य वाजवणे, गायन, वाद्य संगीत साधन अशा प्रकारचे कार्यक्रम संबंधित ठाणेदार किंवा वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून परवाना घेतल्याशिवाय करता येणार नाहीत. सदर आदेशाचा भंग केल्यास त्या व्यक्तीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 136 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे श्री. प्रभू यांनी आदेशात म्हटले आहे. 





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments