जागतिक ग्राहक दिनानिमित्त निंबंध लेखन स्पर्धा

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 11 मार्च 2018

सोलापूर, दि.11 :-  जागतिक ग्राहक दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आाल्या आहेत. जागतिक ग्राहक दिनी 15 मार्च 2018 रोजी या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण केले जाईल.

स्पर्धेसाठी 5 ते 8 वी गटासाठी जागो ग्राहक जागो, 9 ते 10 वी गटासाठी ग्राहक एक चळवळ आणि 11 ते 12 वीच्या गटासाठी ग्राहक अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू असे विषय आहेत. इच्छूक विद्यार्थ्यांनी आपले निबंध जिल्हा ग्राहक संरक्षक परिषदचे अशासकीय सदस्य आनंद सागर यांच्याकडे पाठवावेत. त्यांचा पत्ता - गाळा क्रमांक सहा, मेहता टॉवर, शिवाजी चौक, सोलापूर असा आहे. इच्छूक विद्यार्थी sachinsagar1973@gmail.com किंवा dsosolapur2010@gmail.com  या ईमेलवर आपला निबंध स्कॅन करुन पाठवू शकतात.
दरम्यान, जागतिक ग्राहक दिनाचा मुख्य कार्यक्रम होम मैदान येथे 15 मार्च 2018 रोजी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम पालकमंत्री  विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी केले आहे.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments