पंढरपूर शहर भाजपाच्या वतीने पूनम महाजन यांचे पंढरपुरात जंगी स्वागत

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 11 मार्च 2018


पंढरपूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खा. पूनमताई महाजन यांचे आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पंढरपुरात आगमन झाले. छत्रपती शिवाजी चौकात पंढरपूर शहर भाजप, भारतीय जनता युवा मोर्चा, महिला आघाडी, ओबीसी आघाडी, व्यापारी आघाडी, अल्पसंख्यांक सेल, झोपडपट्टी सेल, वैद्यकीय सेल व युवती आघाडीच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
पूर्णवाद पॉलिटीकल सायन्स अकादमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याकरीता त्या पंढरपुरात आल्या होत्या. हेलिपॅडवर पंढरपूर भाजपाच्या वतीने अध्यक्ष संजय वाईकर तसेच पूर्णवाद पॉलिटीकल सायन्स अकादमीच्या पदाधिकार्‍यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रूक्मिणीच्या दर्शनाकरीता मोटारीने मंदिराकडे जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. 
यावेळी हलगीच्या निनादामध्ये व फटाक्यांची अतिषबाजी करून स्वागत करण्यात आले. यावेळी ओबीसी शहराध्यक्ष लखन ननवरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष विदुल अधटराव, उपाध्यक्ष अक्षय कदम, निलेश चव्हाण, किरण खडाखडे, सरचिटणीस सचिन भोरकडे, अमित गोसावी, प्रशांत धुमाळ, विजय दहिवडे, युवराज शिरगावकर, ओंकार चंदनशिवे, सूरज गोसावी, निखील खडाखडे, राहुल बनसोडे, रोहन शिंदे, अश्पाक मुलाणी, सागर खरात, रवी देवमारे, इस्माईल बागवान, सुमित पवार, सतीश सासवडकर, करण लकेरी, कुणाल कोरे, धनंजय निंबाळकर, व्यंकटेश कोळी, आकाश पोळ, अजय भागानगरे, ओबीसीचे उपाध्यक्ष सुनिल सोळंकी, सरचिटणीस संतोष कोरे, अमित वाघमारे, औदुंबर औसेकर, प्रसिद्धीप्रमुख श्रीकांत ननवरे, कार्याध्यक्ष सोमनाथ कांबळे, बाळू कानारे, गणेश कोळी, पांडुरंग करकमकर, गणेश अंकुशराव, अभिषेक परचंडे, राहुल कोथमिरे, विजय दहिवडे, संतोष कोरे, आनंद नगरकर, लखन माळी, प्रमोद भोसले आदी उपस्थित होते.
या स्वागत समारंभानंतर खा. पूनम महाजन या श्री विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेऊन शनैश्वर मठ येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्याकरीता रवाना झाल्या. या समारंभाच्या ठिकाणीही त्यांचे पंढरपूर शहर भाजप व विविध आघाड्यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले. 
शनैश्वर मठामध्ये खा. पूनमताई महाजन यांना युवक क्रांतीवीर पुरस्कार दिला जाणार आहे. प.पू. अ‍ॅड. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. याच कार्यक्रमात पंढरपूर भाजपच्या वतीने खा. महाजन यांना मानपत्र अर्पण करण्यात येणार आहे.  या पुरस्कार वितरण सोहळ्यास खा. अ‍ॅड. शरद बनसोडे, मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, , आ. प्रशांत परिचारक, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट-पापरकर, डॉ. शेखर चरेगावकर, गुणेशदादा पारनेरकर, नगराध्यक्षा साधना भोसले, शिवराम प्रतिष्ठानचे लक्ष्मीकांत दादा पारनेरकर आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

स्वागतासाठी फलक व भाजपाचे झेंडे
भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खा. पूनमताई महाजन यांच्या पंढरपूर आगमनाप्रित्यर्थ पंढरपूर भाजपच्या वतीने हेलिपॅड ते विठ्ठल मंदिर व विठ्ठल मंदिर ते शनैश्वर मंदिर या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे होर्डिंग्ज लावून स्वागत करण्यात आले होते. तर रस्त्याच्या दुभाजकावर तसेच मंदिर परिसराच्या भोवताली भाजपाचे झेंडे लावण्यात आले होते. हा सारा परिसर भाजपमय होऊन गेला होता. पूनमताई महाजन यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने पंढरपूरकरांनी स्वागत केले.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments