सोलापूर जिल्हा कृषि महोत्सवाला प्रारंभ..!

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 11 मार्च 2018


सोलापूर,:-  राज्य शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने आयोजित कृषि महोत्सावाला उद्यापासून (रविवार) सुरूवात होत आहे. हा महोत्सव 11 ते 15 मार्चदरम्यान होम मैदान येथे आयोजित करण्यात आला आहे. याचा उद्घाटन कार्यक्रम सकाळी 10 वाजता होईल. अशा प्रकारचा कृषि महोत्सव सोलापुरात प्रथमच होत आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणांनी जय्यत तयारी केली आहे.
या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शनिवारी सायंकाळी महोत्सव स्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी महोत्सवाबाबत आवश्यक त्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज बिराजदार, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे यांच्यासह वरीष्ठ शासकीय अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री देशमुख यांनी संयोजन समितीच्या सदस्यांसमवेत कृषि महोत्सवात लावण्यात आलेल्या प्रत्येक स्टॉलची पाहणी केली. दरम्यान त्यांनी लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी गर्दीचे योग्य नियोजन करण्यास सांगितले. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा,  यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments