लोकमान्य पंढरपूर शाखेचा प्रथम वर्धापन दिन संपन्न

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 11 मार्च 2018

लोकमान्यच्या पंढरपूर शाखेस वर्धापनदिनी भेट देताना आ. प्रशांत परिचारक , नागेश भोसले व आदि. 

 पंढरपूर / प्रतिनिधी :- लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीच्या पंढरपूर शाखेचा प्रथम वर्धापन दिन संपन्न झाला. यावेळी लोकमान्यच्या असंख्य ग्रहकांनी पंढरपूर शाखेमधे येउन हा वर्धापन दिन साजरा केला. प्रसंगी आ. प्रशांत परिचारक , नगराध्यक्षा साधना भोसले यांनी देखिल भेट देउन शुभेच्छा दिल्या. 
     दै. तरूण भारतचे समुह प्रमुख श्री किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणा-या लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायतिची गतवर्षी विठुरायांच्या पुण्यनगरीत शाखा सुरू करण्यात आली. वर्षभरामधे असंख्य पंढरपूरकरांच्या विश्वासात पात्र लोकामन्यची पंढरपूर शाखा ठरली आहे. त्यामुळेच कोटयावधींच्या ठेवींचा उंबरठा या शाखेने ओलांडला आहे. 
       आजच्या या शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त श्री व सौ. संतोष कुलकर्णी यांच्या शुभहस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. यावेळी लोकमान्यचे असंख्य ठेवीदार , खातेदार तसेच क्वेस्ट दुर्सचे ग्रहक , विमाधारक यांनी लोकमान्यच्या शाखेस भेट देउन शुभेच्छा दिल्या. याचबरोबरीने चार्टड अकाैंटंट अमोल भालेराव ,  तानाजी सरदार , प्रियांका सांळुखे आदि उपस्थित होते. 
  दिवसभरामधे या शाखेस शुभेच्छा देण्यासाठी आ. प्रशांत परिचारक यांच्यासह , पंढरपूर मर्चण्ट बँकेचे चेअरमन नागेश भोसले ,  विवेकानंद विचाराचे प्रचारक श्री भिंगे गुरूजी , गणेश घांडोरे ,अर्बन बॅकेचे संचालक माजी नगराध्यक्ष हरिष ताठे , पांडुरंग घंटी, सतिश मुळे , रा.पा. कटेकर , नगरसेवक संग्रम अभ्यंकर , संजय निंबाळकर , अनिल अभंगराव , आदित्य फ़त्तेपूरकर , तुंगतचे सरपंच आगतराव रणदिवे, गणेश महाजन,  सचिन डांगे , नवनाथ रानगट , नारायण सिंघण , गणेश देसाई ,मनोज सुरवसे , पिंटू आलगे आदिंनी भेट देउन शुभेच्छा दिल्या. 
   हा वर्धापन ििदनाचा कार्यक्रमाच्या निमिंत्ताने लोकमान्यच्या सोलापूर शाखेचे व्यवस्थापक अशोक कटाप , सांगोला व मंगळवेढा शाखेचे अधिकारी यांनीही हजेरी लावली. तर सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत जगदाळे , अभिमान काळे , प्रतिभा पतके , प्रशांत माने आदिंनी परिश्रम घेतले आहेत. 





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments