लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 11 मार्च 2018
कष्टकरी मायमाऊली खऱ्या सन्मानाची हक्कदार - डॉ.द.ता.भोसले
प्रतिनिधी/पंढरपूर
कष्टकरी,धुणीभांडी करणारी,शेतात राबणारी महिलाच खरी सन्मानाची हक्कदार आहे असे गौरवोद्गार जेष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉ.द.ता.भोसले यांनी काढले.निमित्त होते जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शनिवारी परिस्थितीने सामान्य पण कर्तृत्वाने असामान्य असणाऱ्या महिला गौरव पुरस्कार सोहळ्याचे.येथील बळीराजा प्रतिष्ठान आणि एकच धर्म मानवता धर्म या दोन्ही संस्थांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून समाजोपयोगी अनेक उपक्रम राबवले जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून हॉटेल विठ्ठल इन (पंढरपूर) येथे जागतिक महिला दिनानिम्मित्त बारा कर्तृत्ववान महिलांना जेष्ठ लेखक डॉ.द.ता.भोसले यांचे शुभहस्ते शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह,मेडल व मानपत्र देऊन सन्मानपूर्वक गौरवण्यात आले.
ज्या महिलांनी आयुष्यभर दारिद्र्य भोगलं, जिद्दीनं येणाऱ्या प्रत्येक संकटांना तोंड देत राहिल्या. कठीण परिस्थितीत सुद्धा आपली मुलं शिकवून उच्च पदापर्यंत पोहोचवली. काहींचा कुंकवाचा धनी गेला तरी एकटीने ताकतीने प्रपंचा सावरला अशा एकूण बारा महिलांच्या असामान्य कर्तृत्वाचा सन्मान या वेळी करण्यात आला.यामध्ये श्रीमती प्रमिला कुबेर पवार, सौ.रीना दत्तात्रय पवार, सौ.नवाजबी आलम इनामदार, सौ नम्रता राजेश शहा, श्रीमती अनिता वसंत दिघे, श्रीमती विजयालक्ष्मी शंकर वाघ, सौ.महादेवी मनोज पिंपळे, सौ.शिल्पा ज्ञानराज खोबरे, सौ.सुनीता कल्याण शिंदे, सौ.रेखा दत्तात्रय आसबे, श्रीमती उषा भास्कर घोडके, व सौ राजश्री आनंदा लोले या होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.सौ.स्वाती भोसले होत्या.तर प्रसिद्ध व्याख्याते सोमनाथ गायकवाड, सौ.वर्षाताई भोसले आदीजण व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव राजू इनामदार यांनी केले, सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष साहित्यिक अंकुश गाजरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गाजरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बळीराजा प्रतिष्ठान आणि एकच धर्म मानवता धर्म या दोन्ही संस्थेच्या टीमने अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने तालुक्यातून लोकांची उपस्थिती होती.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com



0 Comments