लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 3 मार्च 2018
पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळु उपश्यात नक्की कोण कोण गुंतलेत? अवैध वाळु उपसा करणांवर का होत नाही कारवाई?
पंढरपूर तालुक्यातील चळे अन सुस्ते येथील नदीपात्रात अवैध वाळु उपसा जोमात चालु आहे. पंढरपूर लाईव्ह ने याबाबत सचित्र बातमी देऊन सुद्धा गेंड्याची कातडी पांघरलेले महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी याबाबत कोणतिही कारवाई केले नाहीत. याचाच अर्थ सगळेच यात गुंतलेत की काय? असा प्रश्न निर्माण होतोय.
याबाबत आता सर्वसामान्य माणसं पण आवाज उठवत आहेत.
एवढे सारे होऊनही जर महसुल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जर याबाबत ठोस कारवाई केली नाही तर पंढरपूर लाईव्ह याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारणार.
अवैध वाळु उपसा करणारे किती निगरगट्ट बनलेत आणि कुणामुळे बनलेत हे सत्य समोर आलेले लपून रहात नाही.
पंढरपूर लाईव्ह ने मागील बातमीत याबाबतीत सविस्तर माहिती दिलेली आहेच. पण या बातमीकडे कानाडोळा करून "आमचं कोण काहीच वाकडं करू शकत नाही! " अशा संभ्रमात असलेल्या वाळु माफियांना त्यांची जागा आम्ही दाखवून देवूच! अशी भूमिका सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतलीय. पंढरपूर लाईव्ह याबाबत सतत पाठपुरावा करत राहीनच.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments