लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 2 मार्च 2018
बोलण्यापेक्षा कृती करण्यावर जास्त भर द्या- संचालक रवींद्र बगले
पंढरपूरः ‘आपण करीयर करताना अनेक अडचणी येतात परंतु एक ध्येय ठेवले आणि त्या दिशेने परिश्रम करत सोबतीला योग्य मार्गदर्शन घेत वाटचाल केल्यास आपल्याला अदभूत यश मिळते. असे करत असताना आपण भविष्य काळावर विस्वास ठेवण्यापूर्वी वर्तमान काळातच अधिक परिश्रम घेतले. तर त्याचा जास्त फायदा होतो. एकूणच बोलण्यापेक्षा कार्य करण्यावर जास्त भर द्या मग नंतर मिळाले यश दुसऱ्याला सांगाण्याची गरज पडणार नाही.’ असे प्रतिपादन सोलापुरातील क्रॉस मेसेंजर सॉफ्टवेअर प्रायव्हेट कंपनीचे संचालक रवींद्र बगले यांनी केले.
गोपाळपूर(ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्पुटर सायन्स अॅंन्ड इंजिनिअरींग व आय.टी.यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ‘स्पिरीट २०१८ या एक दिवसीय तांत्रिक संशोधन महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापुरातील क्रॉस मेसेंजर प्रायव्हेट कंपनीचे संचालक रवींद्र बगले विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. दिपप्रज्वलनानंतर समन्वयक प्रा.एन.एस. माने यांनी कार्यक्रमाच्या प्रास्तविकात ‘स्पिरीट २०१८’ संबंधी माहीती दिली. उपप्राचार्य डॉ. एस.एन. कुलकर्णी यांनी स्वेरीची वाटचाल तसेच संशोधन, एन.बी.ए, नॅक अशी मिळालेली विविध मानांकने याबाबत माहिती दिली. दिवसभर झालेल्या संशोधनपर कार्यक्रमात रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट (केस स्टडी), ब्लाईंन्ड सी, प्रात्यक्षिक, जावा बॅटल, वेब डिझाईन, बी.द.डीबगर, एनएफएस, लीड इंडिया, शोर्ट अॅनिमेटेड फिल्म, सेमिनार कान्टेस्ट या व असे महत्वाचे राज्यस्तरीय इव्हेंन्टस् झाले. यातून बौध्दीक गोष्टींना चालना देणार्या कार्यक्रमांची स्पर्धा झाल्या यामध्ये महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातून एकूण ७७९ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. संपूर्ण विभागाची आकर्षक सजावट केली होती. पुढे बोलताना क्रॉस मेसेंजर सॉफ्टवेअर प्रायव्हेट कंपनीचे संचालक तसेच सिंगापूर मधील हॅगोम कंपनीचे मुख्य तांत्रिक अधिकारी बगले म्हणाले ‘ मी पहिल्या महिन्यात १८ हजार पगारावर नोकरी सुरु केली पुढच्या काही अवधीत ३५ हजार महिना मिळवू लागलो त्यानंतर माझ्या कामाचे स्वरूप आणि स्मार्ट वर्क पाहून कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ७५ हजार रुपये महिना देवू केले. हे सर्व माझ्या गुणवत्तेमुळे शक्य झाले. पुढे माझा आत्मविस्वास आणि गुणवत्ता स्वस्त बसू देईना. मी दुसरीकडे नोकरी करण्यापेक्षा स्वतःची कंपनी निर्माण करून त्यात गुणवत्ता असणारे कर्मचारी, अधिकारी घेवू शकतो असा आत्मविस्वास आल्याने मी कंपनी काढली.’ वेळ काळ न पाहता नवनवीन संधी निर्माण झाल्या मी फक्त त्याचा पाठपुरावा केला. आज अनेक ठिकाणी मार्गदर्शनासाठी जाताना अनेक विद्यार्थी गुणवत्तापूर्ण असल्याचे दिसून येतात. त्यांना मार्गदर्शन व्यवस्थित केल्यास विद्यार्थी गुणवंत होतात. संधी सगळ्यांना मिळत असते परंतु ते ओळखूनमिळालेल्या संधीचे सोने करायला पाहिजे. यासाठी स्वतःच्या उणीवा व कमतरतेकड़े लक्ष न देता प्लस पॉइंट कड़ेअधिक लक्ष द्यावे. कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा बाऊ न करता ध्येयपूर्ण करण्याच्या दिशेने काम करा, नोकरीपेक्षा उद्योग धंद्याकड़े वळा. कमीत कमी छोटासा तरी स्वतःच व्यवसाय असावा जेणेकरून तुम्हाला तुमच्या कामात पुरेपूरआनंद व समाधान मिळेल, पैसे जमा होतील व स्वतःची देखील ओळख निर्माण होईल.’असा विश्वास उद्योजक बगले यांनी व्यक्त केला. या राज्यस्तरीय स्पर्धेत पेपर प्रेझेंटेशनसाठी स्पर्धकांना आपली गुणवत्ता व बौध्दीक वाढ यामधील कौशल्य दाखविले. यावेळी अधिष्ठाता डॉ. एस.एम.मुकणे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. अनुप विभूते,सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. नवनाथ खडके, कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रा व्ही.डी. जाधव, आयकॉनचे अध्यक्ष शुभम परदेशी व उपाध्यक्ष श्रीपाद तारापुरकर यांच्यासह विविध प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन दिक्षा यारगट्टीकर व श्रुती कोळी यांनी केले तर आभार समन्वयक प्रा.एन.एस. माने यांनी मानले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments