लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 9 मार्च 2018
ट्रॅव्हल्सचे प्रवासी त्रासले - अॅड.अजित देशमुख
बीड ( प्रतिनिधी ) बीड जिल्ह्यात आणि विशेषतः आष्टी तालुक्यात रात्री उशिरापर्यंत धाबे चालू असतात. काही ट्रॅव्हल्स आणि एस. टी. महामंडळाच्या बसेस येथे जेवणासाठी थांबतात. कसल्याही सुविधा नसलेले हे धाबे नियम मोडून जादा वेळ चालतात. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांचे कारवाई करावी, अशी मागणी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केली आहे.
या धाब्यावर कोणत्याही सुविधा नाहीत. रात्री अशा ठिकाणी गाड्या थांबतात कशा ? हाही प्रश्न आहे. शिवाय प्रत्येक बस स्थानकात कँटिनची व्यवस्था असताना एस. टी. महामंडळाच्या बसेसही येथे थांबतातच कशा ? त्याला महामंडळाची परवानगी आहे का ? हेही समजत नाही.
काही हॉटेल आणि धाबे अशा रीतीने थांबणाऱ्या बसेसच्या ड्रायव्हरला विशेष सुविधा पुरवित असल्याची चर्चा आहे. बस स्टँड मध्ये सर्व सुविधा आणि सुरक्षा असताना खाजगी ठिकाणी ही वाहने थांबविणे चुकीचे आहे. एस टी. महामंडळाने त्यांच्या बसेस कोठे कोठे थांबविण्यास परवानगी आहे, हे जाहीर केले पाहीजे.
या धाब्यांवर कोणतीही व्यवस्था नाही. लोक गाडीतून उतरले की, बेचैन होतात. विशेषतः महिलांना याचा जादा त्रास होतो. तरीही रात्री येथे गाड्या उशिरा थांबविल्या जातात. यातही प्रवासी त्रासले आहेत. यात काही तरी संगनमत आहे.
अन्न भेसळ अधिकाऱ्यांनी जर इथले खाद्य पदार्थ तपासले तर हॉटेल चालक, मालक जेलमध्ये जातील अशी काही ठिकाणी परिस्थिती आहे. असे असले तरी अन्न भेसळ खाते झोपले आहे.
हॉटेल, धाब्याला परवानगी देताना तेथील खाद्य पदार्थांचे भाव ठरवून घेतले जातात. अशा भावफलकाचे बोर्ड दर्शनी भागात लावले पाहिजेत. मात्र ते लावले गेले नाहीत. धाब्यांना परवानगी देताना ते सकाळी किती वाजता उघडायचे आणि रात्री किती वाजता बंद करायचे, याची वेळ ठरवून दिली जाते. या वेळेचे उल्लंघन झाले तर कारवाई करणे गरजेचे असते. मात्र अशी कारवाई होत नाही. म्हणून अशा प्रवृत्ती बळावत चालल्या आहेत. पोलीस, अन्न भेसळ आणि महसूल प्रशासनाने या लोकांवर गुन्हे दाखल करून धाबे बंद करण्याची कारवाई करावी. जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी अशा कारवाया व्हाव्यात, असे अँड. देशमुख यांनी म्हंटले आहे.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com



0 Comments