पंढरपूरचे जनप्रिय डी.वाय.एस.पी.निखिल पिंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्यातून शुभेच्छांचा वर्षाव ! परिवेक्षाधिन डी.वाय.एस.पी. संदीप मिटके यांचा ही वाढदिवसानिमित्त सत्कार !

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!



पंढरपूर LIVE 7 March 2018
पंढरपूर : पंढरपूरचे जनप्रिय डी.वाय.एस.पी. निखिल पिंगळे व परिवेक्षाधिन डी.वाय.एस.पी. संदीप मिटके यांचा वाढदिवस सर्वसामान्य जनतेने आज उत्साहाने साजरा केला. पोलीस अधिकार्‍यांचा वाढदिवस अशा पध्दतीने नागरिकांनी स्वयंस्फुतपणे साजरा केल्याची पंढरीतील आजची घटना म्हणजे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकार्‍यांना नागरिकांनी सच्च्या  मनाने दिलेली प्रेमाची पोहोच पावती आहे. डी.वाय.एस.पी. कार्यालयामध्ये आज पंढरपूर युवा मुद्रक संघ, पंढरपूर लाईव्ह सोशल फाऊंडेशन, सेवा प्रतिष्ठाण, व संभाजी ब्रिगेड, यांच्या वतीने डी.वाय.एस.पी. निखिल पिंगळे व परिवेक्षाधिन डी.वाय.एस.पी. संदीप मिटके यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी निखिल पिंगळे यांनी केक कापला तसेच पंढरपूर युवा मुद्रक संघाचे अध्यक्ष दत्ता पाटील,पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे, सेवा प्रतिष्ठाणचे संस्थापक गणेश शिंघण,संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे यांनी पुष्पहार,शाल श्रीफळ देऊन दोन्ही मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी मुद्रक संघाचे सचिव मंदार केसकर, प्रदीप भोरकर, श्रीनाथ साळुंखे, संजय यादव, संतोष गोंजारी,सादिक शेख, काँग्रेस आयचे संदीप पाटील, शिवबुध्द युवा प्रतिष्ठाणचे संदीप मुटकुळे, डॉ. अरूण मेनकुदळे, सुरज पावले जनसेवा संघटनेचे संग्राम जाधव, सावता जाधव, आदिसह अनेकजण उपस्थित होते. 

















पंढरपूर उपविभागात निखिल पिंगळे यांची नियुक्ती होण्यापुर्वीच एक आय.पी.एस अधिकारी पंढरपूर मध्ये डी.वाय.एस.पी.म्हणून येणार व येथील वाढत्या गुंडगिरीला व अवैध धंद्याना चाप बसणार ! अशी चर्चा पंढरीत सुरू होती. येथील डी.वाय.एस.पी कार्यालयाचा पदभार स्विकारल्या नंतर नागरिकांनी पिंगळे यांच्यावर ठेवलेला विश्‍वास साहेबांनी सार्थ करून दाखविला. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे कर्तव्य बजाविताना प्रसंगी डी.वाय.एस.पी निखिल पिंगळे यांनी स्वत: अवैध धंद्यांच्या अडड्यावर एकट्याने जाऊन वस्तुस्थिती माहिती करून घेतली.व अवैध धंदे करणार्‍यांना तडकाफडकी गजाआड केले. यांचबरोबर पंढरीतील अनेक गावगुंडाना चोप देऊन ताळ्यावर आणले. अनेक गुन्ह्यामध्ये नाव असूनही उजळ माथ्याने फिरणार्‍या सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन अनेकांना तडीपार करण्याचे धाडसी काम केले. अल्पावधीतच त्यांच्या कर्तव्यदक्ष कार्याची महती अनेकांना दिसून आली. सोलापूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधिक्षक विरेश प्रभू साहेबांनीही वेळोवेळी निखिल पिंगळे यांना मार्गदर्शन करून त्यांच्या कार्याचे कौतुकही केले. आज डी.वाय.एस.पी.निखिल पिंगळे यांच्या वाढदिवसा निमित्त पंढरपूर विभागातील अनेक नागरिक, ग्रामस्थ,सामाजिक संघटना, राजकीय व विविध क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांना विश्‍वासाची व प्रेमाची पोहोच पावती दिली. 



पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments