आमदार श्री भारत भालके यांचा शेतकर्‍यांच्या वीज पुरवठा बाबत विधानभवनामध्ये तारांकित प्रश्‍न

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 9 मार्च 2018


पंढरपूर ः - सध्या चालू असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी पंढरपूर व मंगळवेढा, जि.सोलापूर येथील महावितरण कंपनीने वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे जनावरांच्या व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे आमदार श्री भारत भालके यांनी महाराष्ट्र विधान मंडळात तारांकित प्रश्‍नाद्वारे ता.प्र.क्र.110483 या मुद्याद्वारे महावितरण कंपनीने गांवातील वीज पुरवठा व शेतकर्‍यांच्या कृषिपंपाचा वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.  तसेच शेतकर्‍यांचे कृषिपंप बंद असल्यामुहे पिकांना पाणी देता येत नसल्यामुळे ती जळून जात असल्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे या शासनाच्या वीज पुरवठा खंडीत करण्याच्या निर्णयाविरोधात पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यामध्ये ठिक-ठिकाणी दि.7 जानेवारी, 2018 रोजी रास्ता रोको आंदोलने केली असल्यामुळे शासनाने दुष्काळामधील शेतकर्‍यांची वीज बिले माङ्ग करावी व थकीत वीज बिले भरण्यासाठी 4-6 महिन्यांची मुदतवाढ द्यावी. तसेच तालुक्यातील प्रलंबित सिंगलङ्गेज योजना तातडीने सुरू करून गांव डीपींचा प्रश्‍न त्वरीत सोडवून शेतकर्‍यांना दिलासा देणेबाबत शासनाने अद्याप कोणती कार्यवाही केली आहे व करण्यात येत आहे असे आमदार श्री भारत भालके यांनी असा तारांकित प्रश्‍न उपस्थित केला.
त्यावर ऊर्जा मंत्री मा.ना.श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या तारांकित प्रश्‍नाला लेखी उत्तर दिले असून यामध्ये दि.7 जानेवारी, 2018 रोजी पंढरपूर,मंगळवेढा,जि.सोलापूर या परिसरामध्ये ठिक-ठिकाणी झालेली शेतकर्‍यांची आंदोलने त्यांनी मान्य करून पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील कृषिपंप धारकांच्या वीज देयकांचे निराकरण करण्यासाठी ङ्गिडरनिहाय 15 शिबिरे घेण्यात आलेली असून सर्व शेतकर्‍यांच्या तक्रारींंचे निराकरण लवकरच केले जाईल असे लेखी आश्‍वासन आमदार श्री भालके यांना दिल्यामुळे शेतकर्‍यांचे प्रलंबित प्रश्‍न तातडीने मार्गी लागण्याच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचा वीजेचा प्रश्‍न आमदार श्री भालके यांनी राज्य शासनाकडे प्रखरपणे मांडल्यामुळे सर्व शेतकरी वर्गातून त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments