लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 9 मार्च 2018
सांगोला/प्रतिनिधी :
सांगोला शहरातील वाढेगांव नाका परिसरातील रहदारीच्या ठिकाणी गतीरोधक तयार करावेत. अशी मागणी येथील नागरिकांच्या वतीने निवेदनाद्वारे शहीद अशोक कामटे संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता जी.डी.परदेशी यांच्याकडे करण्यात आली आहे.
सांगोल्यातील वाढेगांव नाका परिसरात कोल्हापूर, सोलापूर, सांगोला, पंढरपूर यासह अनेक ठिकाणाहून वाहने याठिकाणी भरधाव वेगाने या चौकात एकत्रित येतात. हा रस्ता वर्दळीचा सतत असल्याने जड वाहनावर कोणतेही नियंत्रण गतीरोधक नसल्याने राहत नाही. आतापर्यंत तीन ते चार जणांना या चौकात आपला अनमोल जीव अपघातामुळे गमवावा लागला आहे. तरी या चौकात प्रत्येक मार्गावरुन येणाऱ्या रस्त्यावर दोन गतीरोधक तात्काळ तयार करावेत. अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी संस्थापक प्रा.निलकंठ शिंदे, अच्युतराव फुले, तौसिफ शेख, यांच्यासह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments