लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 9 मार्च 2018
आ.प्रशांतराव परिचारक यांच्या मुळे १२ गावांना होणार फायदा
पंढरपूर प्रतिनिधी
कासेगाव सह इतर १२ गावांच्या पिण्याचे पाण्यासाठी सुरु केलेली कासेगाव पाणीपुरवठा योजना गेले सात वर्षापासून बंद होती.यावर्षी आ.प्रशांतराव परिचारक यांनी पाठपुरावा केल्याने राष्ट्रीय पेयजल योजनेतून खर्डी याजनेसाठी १ कोटी १८ लाख,ओझेवाडीच्या स्वतंत्र योजनेसाठी १ कोटी १८ कासेगावच्या दुरुस्तीसाठी २५ लाख व लाखास मंजुरी दिल्या मुळे कासेगाव योजनेचे थकीत विदयुत बिल व दुरुस्तीची कामे झाली असल्याने ही योजना सुरु होत आहे त्यामुळे या १२ गावांना त्याचा लाभ होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य व पांडुरंग सह साखर कारखान्याचे व्हा वसंतराव देशमुख यांनी दिली.
युती सरकारच्या काळात कासेगाव पाणीपुरवठा योजनेचे काम पुर्ण सोलापूर जिल्हा परिषदच्या माध्यामातून झाले होते पंढरपूरच्या भीमा नदीच्या पात्रातून पाणी उचलून शुध्दीकरण करुन ते कासेगाव,गोपाळपूर,मुंढेवाडी,रां
ही योजना सुरु करण्यासाठी जि.प.सदस्य वसंतराव देशमुख आ.प्रशांतराव परिचारक यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशिल होते.त्यांनी योजना सुरु करण्यासाठी ४ मार्च २0१७ ला सर्वसाधारण सभेत या कामाच्या खर्चाचा प्रस्ताव मंजुर करुन घेतला.मात्र तरिही योजना चालु करण्यासाठी विलंब होवु लागल्याने उपोषणाचा इशाराही जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला होता.त्यानुसार २१ जानेवारी रोजी वसंतराव देशमुख,कासेगाव गणातील पंचायत समिती सदस्य प्रशांत देशमुख व सरकोली गणाच्या सदस्य राजश्री पंडीतराव भोसले हे या १२ गावातील प्रमुख कार्यकत्र्यासह उपोषणास बसण्यासाठी सोलापूर जि.प. कार्यालयात गेले होते तेव्हा आ.प्रशांतराव परिचारक यांच्या पत्रानुसार जि.प.अध्यक्ष संजय शिंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेद्र भारुड व अर्थ खात्याचे सभापती विजयराज डोगरे यांनी तातडीने निर्णय घेवून या योजनेसाठी राष्ट्रीय पंेयजल योजनेतून निधी मंजूर केला व रक्कम अदा केली.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




0 Comments