जागतिक महिला दिनानिमित्त पंढरपूर नगरपरिषदेकडून कर्तबगार महिलांचा सत्कार

लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!

पंढरपूर LIVE 9 मार्च 2018







पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने जागतिक महिला दिना निमित्त विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणा-या कर्तबगार महिलांचा सत्कार संपन्न

पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने नगरपरिषदेच्या सभागृहामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त पंढरपूर शहरातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य करणा-या कर्तबगार महिलांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद् घाटक सौ.सिमाताई प्रशांतराव परिचारक यांच्या शुभहस्ते, नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली, या कार्यक्रमाच्या संयोजिका व महिला-बालकल्याण समिती सभापती रेणुका धर्मराज घोडके, वैशाली विठ्ठल दबडे, वैष्णवी विशाल मलपे, वासंती उमेश विरदे, शामल लक्ष्मण शिरसट, वैशाली सुनिल वाळुजकर, माधुरी अभय जोशी, अश्विनी विवेक परदेशी, रेखा अनिल अभंगराव, कमलताई तोंडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
      यावेळी बांधकाम समिती सभापती मालन भगवान देवमारे, पाणीपुरवठा समिती सभापती सुप्रिया सचिन डांगे, आरोग्य समिती सभापती अनुसया दत्तात्रय शिरसट, राजश्री प्रताप गंगेकर, रेहाना इब्राहीम बोहरी, सुरेखा दिलीप पवार, शकुंतला विजयकुमार नडगिरे, अर्चना नवनाथ रानगट, सुजाता त्रिंबक बडवे, रंजना शंकर पवार, भाग्यश्री देवेंद्र शिंदे, श्वेता निलराज डोंबे, लतिका विठ्ठल डोके, स्वाती महादेव धोत्रे, सारिका राहुल साबळे, रुक्मिणी प्रल्हाद यादव, करुणा निलेश आंबरे हे उपस्थित होते.
यावेळी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आदर्श माता पुरस्कार कमलाबाई शिवा वाळुंद्रे, शकुंतला वसंत इंगळे, आदर्श शिक्षिका सुप्रिया संजय बहिरट, अंजली अनिरुद्ध बडवे, राजश्री बरगली चंडके, श्री.विठिठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य शकुंतला विजय नडगिरे, आदर्श संस्थापिका शोभा वासुदेव बडवे, कोमल जगदाळे (रनिंग अॅथलटिक), संतोषी देशमुख (थाळीफेक), अॅड.जुबेदा अजिज शेख, आदर्श पोलीस हवालदार स्वाती लोंढे, डॉ.आशालता कारंडे, डॉ.संगिता पाटील (समुपदेशक), आदर्श एस टी कामगार ज्योस्त्ना फुलारे, आदर्श अग्निशामक कामगार चैताली सावळकर, आदर्श बँक सेविका शशिकला पाटील, आदर्श कला मार्गदर्शक जागृती खंडेलवाल, जेष्ठ नागरीक संघ अध्यक्ष सुरेखा कुलकर्णी, आदर्श महिला बचत गट वैशाली माने, महिला उद्योजिका प्रतिभा देशमुख, आदर्श गृहिणी माधवी यादव या सर्व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन नगरपरिषदच्यावतीने करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजक महिला-बालकल्याण समिती सभापती सौ.रेणुका धर्मराज घोडके यांनी केले होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.संगिता पाटील यांनी केले. यावेळी शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

  • mail-livepandharpur@gmail.com

  • web - http://www.pandharpurlive.com

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Post a Comment

0 Comments