लवकरंच साजरा होणार पंढरपूर लाईव्हचा वर्धापन दिन..! एका आगळ्या-वेगळ्या समारंभाची प्रतीक्षा आणखी कांही दिवस..!
पंढरपूर LIVE 20 मार्च 2018
पंढरपूरचे अपक्ष नगरसेवक कै. संदीप दिलीप पवार यांच्या मातोश्री माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका श्रीमती सुरेखा दिलीप पवार यांनी पोटच्या गोळ्याची निर्घृण हत्या झालेली असतानाही एक सामाजिक जबाबदारी ओळखून संदीप पवार यांच्या हत्याकांडानंतर सर्वांनाच शांततेचं आवाहन करुन आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून दिलाय.
दि. 18 मार्च 2018 रोजी नगरसेवक यांची हत्या झाली. या हत्येच्या निषेधार्थ पंढरपूरमधील व्यापार्यांनी गुढी पाडवा असूनही स्वयंर्स्फूतपणे कडकडीत पंढरपूर बंद केले. परंतु दि. 20 मार्च रोजी कांही समाजविघातक मंडळींनी मात्र वेगवेगळ्या अफवा पसरवून शहरातील शांततेला बाधा पोहचवण्याचे दुष्कृत्य केले. याची गंभीर दखल घेत दिवंगत संदीप पवार यांच्या मातोश्री तथा पंढरपूर च्या माजी नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका श्रीमती सुरेखा दिलीप पवार यांनी तातडीने एक प्रसिध्दीपत्रक जाहीर करुन याद्वारे पंढरपूरकरांना शांततेचं आवाहन केलंय. कोणत्याही अफवांना बळी पडू नये. आमचे कुटूंबातील कोणीही पंढरीतील शांतता व सुव्यवस्था भंग करणारांचे समर्थन करणार नाहीत. सर्वांनी संयम दाखवावा व पंढरीतील सर्वसामान्य नागरिकांनी व व्यापार्यांनी आपले दैनंदीन व्यवहार निर्भयपणे करावेत. असे आवाहन दु:खाच्या काळातही त्यांनी केलंय. यामुळे पंढरपूरकरांच्या मनात श्रीमती सुरेखाताई पवार यांच्याबाबतचा आदर आणखी वाढला आहे.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com






0 Comments