पंढरपूर LIVE 18 मे 2018
जलयुक्त शिवार अभियानातून
आतापर्यंत 11 हजार गावे दुष्काळमुक्त
यावर्षी 6 हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जलसंधारणातून दुष्काळमुक्तीसाठी कटिबध्द .. मुख्यमंत्री
सांगली, दि. 18 : महाराष्टाला दुष्काळमुक्त करण्याच्या निर्धाराने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून आतापर्यंत राज्यातील 11 हजार गावे दुष्काळमुक्त झाली असून यावर्षी 6 हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला, तसेच जलसंधारणातून दुष्काळमुक्तीसाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जत तालुक्यातील आवंढी येथील भटकीमळा डोंगरपरीसरात पाणी फौंडेशन आणि लोकसहभागातून करण्यात येत असलेल्या जलसंधारण कामांची पाहणी करून त्यांनी श्रमदान केले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, पाणी फौंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, भारतीय जैन संघटनेचे प्रमुख शांतीलाल मुथा आदि मान्यवर उपस्थित होते.
राज्याचा 50 टक्के भाग दुष्काळाने होरपळत होता, या दुष्काळग्रस्त भागाला जलयुक्त शिवारच्या माध्यमातून दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठ्या धरणांच्या बरोबरीने जलसंधारणाच्या प्रणालीव्दारे ही गावे दुष्काळमुक्त करण्यास शासनाने प्राधान्य दिले असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानात लोकसहभाग वाढविल्याने लोकांना ही कामे आपली वाटू लागली आहेत. त्यामुळे गावागावात जलसाठे निर्माण होवू लागले. राजकारण, गट-तट बाजूला सारुन लोकं पाण्यासाठी एकत्र येऊ लागली आहेत. गावात पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब गावाच्या मालकीचा आहे, ही मानसिकता गावकऱ्यांमध्ये निर्माण झाली असून जलसंधारणाच्या कामात निसर्गाला समजावून घेवून गावकऱ्यांनी काम केल्याने दुष्काळमुक्तीचा मार्ग सुकर झाला आहे.
पाणी फौंडेशनने दुष्काळमुक्तीसाठी हाती घेतलेल्या कामाचे कौतुक करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाणी फौंडेशनने जलसंधारणाचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून मॉडेल तयार करून या कामात गावागावांचा सहभाग घेतला. त्यामुळे अनेक गावात जलसंधारणाची क्रांतीकारी लोकचळवळ उभी राहिली आहे. आज गावाचा धर्म, जात, पार्टी, गट या सर्वांचे ध्येय केवळ पाणी झाले आहे. सर्वजण एकदिलाने, एकजुटीने पाण्यासाठीच काम करीत आहेत, ही सर्वार्थाने महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सारे आवंढी गाव जलसंधारणाच्या कामासाठी मैदानात उरतले असून दुष्काळ पराजीत होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. गेल्या 50 वर्षात होऊ न शकलेले काम केवळ एका वर्षात आवंढीकरांनी केले आहे. पाण्याचे शास्त्र समजून घेवून निसर्गाच्या वाटा शोधून जलसंधारणाचे काम केले, हे राज्याला दिशादर्शक आहे, असा गौरवही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. आवंढीच्या गावकऱ्यांकडून केलेले जलसंधारणाचे काम लाख मोलाचे असून गेल्या 45 दिवसापासून अथक मेहनत करणाऱ्या गावकऱ्यांसमवेत काही वेळ श्रमदान करता आले याचे समाधानही त्यांनी व्यक्त केलेे.
पाणी आहे तिथे जीवन आहे. पाणी आहे तिथे समृध्दी आहे. अशी पाणीदार समृध्दी गावकऱ्यांच्या ताकदीतून निर्माण करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाणी फौंडेशनबरोबरच जैन संघटनेने जलसंधारणाच्या कामासाठी केलेले सहकार्य कौतुकाचे आहे. पाणी फौंडेशनने आयोजित केलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी सहभाग घेतलेल्या गावांना विशेषत: आवंढी गावकऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. आवंढी येथील जलयुक्त शिवारच्या कामाच्या अनुषंगाने डिझेल संदर्भातील प्रश्न निश्चितपणे दूर करू. जलसंधारणाचे काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. आवंढीकरांची एकजूट दुष्काळमुक्तीसाठी उपयुक्त असून राज्याच्या इतर गावांना ती प्रेरणादायी असल्याचा गौरवही त्यांनी यावेळी केला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावकऱ्यांसमवेत जलंधारणाच्या कामामध्ये श्रमदान केले. त्यामुळे काम करणाऱ्या गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण झाले. त्यांनी यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधला व पाणी फौंडेशनच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जलसंधारण कामांची माहिती घेतली.
सरपंच आण्णासाहेब कोडग यांनी मान्यवरांचे स्वागत केले व भटकीमळा परीसरात सुरू असलेल्या जलसंधारण कामांची माहिती दिली. ते म्हणाले, आवंढी गावात आज भटकीमळा येथे 40 हेक्टर क्षेत्रावर जलसंधारणाचे काम सुरू असून त्यामध्ये कंपार्टमेंट बंडींग, सीसीटी, डिप सीसीटी, मातीनाला बांध, दगडी बांध अशी जलसंधारणाच्या माथा ते पायथा जलसंधारण प्रणाली राबविल्याची माहिती दिली.
समारंभास माजी महापौर सुरेश पाटील, नीता केळकर, जैन संघटनेचे जिल्हा प्रमुख राजगोंडा पाटील, पाणी फौंडेशनचे जिल्ह्याचे प्रमुख सत्यवान देशमुख, जतचे उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले, तहसिलदार अभिजीत पाटील, उपसरपंच प्रदिप कोडग यांच्यासह आवंढी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००
वृ.वि.2123 2 8 वैशाख, 1939 (दु.2.25वा.) दि. 18 मे 2018
वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावागावात परिवर्तन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- जत तालुक्यातील बागलवाडी येथे जलसंधारण कामांची पाहणी व श्रमदान
सांगली, दि. 18 : तीन वर्षापूर्वी जत तालुक्याची ओळख दुष्काळी तालुका अशी होती. मात्र जलसंधारणाच्या कामामुळे हा तालुका हळूहळू टँकरमुक्त होवू लागला आहे. समाजाने मनावर घेतले तर काय परिवर्तन होवू शकते, याचा प्रत्यय मला बागलवाडीत आला. वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून धर्म, जात, गट, पक्ष विसरून पाण्यासाठी लोक एकत्र आले आहेत. त्यामुळे गावागावात परिवर्तन होवू लागले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
जत तालुक्यातील बागलवाडी येथे पाणी फाऊंडेशन आणि लोकसहभागातून करण्यात येत असलेल्या जलसंधारणाच्या कामांची पाहणी नंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी आण्णासाहेब चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, पाणी फौंडेशनचे डॉ. अविनाश पोळ, सत्यवान देशमुख, जैन फाऊंडेशनचे शांतीलाल मुथा आदि मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, एखाद्या योजनेला जनतेची साथ मिळत नाही, ती योजना जनतेची होत नाही, तोपर्यंत ही यशस्वी होत नाही. म्हणूनच जलयुक्त शिवार योजनेला जनतेची साथ मिळावी, लोकसहभाग वाढावा, योजना लोकांना आपलीशी वाटावी, अशी योजना आखली. तीला अमीरखान यांच्या वॉटर कप स्पर्धेची साथ मिळाली. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यभरात गावोगावीच्या ग्रामस्थांनी जलसंधारणाचा एकच ध्यास घेवून श्रमदान केले. गावात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब गावात अडवून, जिरवला, याच मंत्राच्या आधारावर 75 तालुक्यातील हजारो गावे झपाटून काम करीत आहेत, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, तीन साडेतीन वर्षापूर्वी राज्यात 52 टक्के भाग अवर्षणप्रवण, दुष्काळी होता. कितीही मोठी धरणं बांधली तरी या भागात दुष्काळमुक्ती होऊ शकत नव्हती. धरणं आवश्यक आहेतच, पण त्याचबरोबर विकेंद्रित पध्दतीने पाणलोटाचे स्त्रोत निर्माण करणे आवश्यक होते. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून गेल्या वर्षापर्यंत राज्यातील जवळपास 11 हजार गावे दुष्काळमुक्त झाली. यावर्षी 6 हजार गावे दुष्काळमुक्त होतील आणि पुढील वर्षाखेरीज राज्यातील जवळपास 20 हजार गावे दुष्काळमुक्त झालेली असतील, असा विश्वास व्यक्त करून याचे श्रेय जनसहभागाला दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बागलवाडीच्या ग्रामस्थांसह हजारो नागरिकांनी वॉटर कप स्पर्धेत श्रमदान करून दुष्काळाशी दोन हात केले व दुष्काळाला पराभूत केले. त्यामुळे महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्य या माध्यमातून सत्यात आले आहे, असे स्पष्ट करून त्यांनी बागलवाडी गावाला बागांचे गाव करण्यासाठी प्रयत्नशील असून जलसंधारणाच्या कामासाठी एकत्र येणाऱ्या नागरिकांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री यांनी केले श्रमदान
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: हातात पाटी व खोरे घेवून श्रमदान केले. त्यांना आमदार सुरेश खाडे, आमदार विलासराव जगताप, शांतीलाल मुथा यांच्यासह अन्य मान्यवरांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे श्रमदान करणाऱ्या नागरिकानांही प्रेरणा मिळाली.
या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती तमनगौडा रवीपाटील, माजी महापौर सुरेश पाटील, नीता केळकर, गोपीचंद पडळकर, जतचे उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे, मिरज उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले, तहसिलदार अभिजीत पाटील, बागलवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००
वृ.वि.2124 2 8 वैशाख, 1939 (दु.2.25वा.) दि. 18 मे 2018
राज्यभरात साडेसहा लाखाहून
अधिक क्विंटलपेक्षा जास्त हरभरा खरेदी
- सुभाष देशमुख
मुंबई, दि. 18 : राज्यभरात 197 खरेदी केंद्रावर 15 मे 2018 पर्यंत 6 लाख 55 हजार 801 क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली.
यावर्षी हरभरा खरेदीचे उद्दिष्ट 30 लाख क्विंटल आहे. 47 हजार 762 शेतकऱ्यांनी हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com







0 Comments