पंढरपूर LIVE 18 मे 2018
भीमेचे पात्र कोरडे.. पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने दिलासा..!
उजनी धरणात पाणीसाठा असुनही भीमेच्या पात्रात पाणी न सोडल्यामुळे भीमेचे पात्र कोरडे पडलेय. शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. परंतु आज पंढरपूर तालुक्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने या पावसाचा फायदा पिकांना झालाय त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
शेळवेत मेघगर्जनेसह पाऊस
शेळवे वार्ताहर : ता :पंढरपुर येधे शुक्रवारी सांय 7:30 सोसाट्याच्या वार्यासह व मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. गेली दोन-तिन दिवसापासुन रोज फक्त मेघगर्जना व सोसाट्याचा वारा सुटत होता.शुक्रवारी माञ पाऊसाने हजेरी लावली .शुक्रवार बाजारात माञ व्यापारी वर्गाची पळापळी झाली.
भिमा नदि कोरडी पडल्यामुळे पिकांना पाणी या पाऊसामुळे मिळाल्याचा ही आनंद शेतकर्याच्या चेहर्यावर दिसत होता.
उकाड्याने हैराण झालेल्या शेळवे करांना पाऊसाने आल्हाददायक गारवा दिला.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments