कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन...

पंढरपूर LIVE 31 मे 2018

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन.

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन झालंय.पहाटे 4 वाजून 35 मिनिटांनी ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळतेय. वयाच्या 67 व्या वर्षी फुंडकर यांचं निधन झालं.राज्यात काँग्रेसचं वर्चस्व असताना भाजपा वाढवण्याचं काम फुंडकर यांनी केलं. फुंडकर यांच्या निधनानं राज्यात भाजपा रुजवणारा नेता हरपल्याची भावना व्यक्त होतेय. कृषीमंत्री म्हणून फुंडकर यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले. प्रसारमाध्यमांपासून दूर राहून काम  करणारा नेता, अशीत्यांची ओळख होती. शहरी पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपाला ग्रामीण भागापर्यंत नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. कार्यकर्त्यांमध्ये भाऊसाहेब नावानं ओळखलेजाणाऱ्या फुंडकर यांनी विधानसभा आणि विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहांमध्ये काम केलंय. याशिवाय ते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देखील राहिले आहेत.









महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

  • Whatsup- 8308838111  Mobile- 7972287368,  8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments