पंढरपूर LIVE 1 Jun 2018
पंढरपूरः-कासेगांव (ता.पंढरपूर)येथील श्री. विठठ्ल इन्स्टिटयूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित, लोटस इंग्लिश स्कूल,कासेगांवच्या सी.बी.एस. ई. १० वी च्या नुकत्याच झालेल्या केंद्रिय माद्यमिक शिक्षण मंडळ, दिल्ली (सी.बी.एस.ई.) च्या मार्च२०१८ या परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
त्यामध्ये १० वीतील प्रद्युम्न भोसले याने ८४.२ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, तेजस सिंघन हा ८१ टक्के गुण मिळवून द्वितीय तर सुभान शेख याने ७९.६ टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळविला. याचबरोबर सुरज सलगर (७८ टक्के),प्रथमेश जमदाडे (७४.८ टक्के), साक्षी मारे (७४.४ टक्के), राहूल खताळ (७३ टक्के), जयराज देशमुख (७२.८ टक्के), दिग्विजयमोरे (७१.४ टक्के) व दिपक शिंदे (७० टक्के) या सर्वांनी ७० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवण्याची किमया केली. शाळेत घेण्यात आलेल्या प्रॅक्टीस सेशन, अभ्यासक्रमाचे रिव्हीजन, सराव परीक्षा, विद्यार्थी विकास कार्यक्रम, नाईट स्टडीचे नियोजन,वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे तंतोतंत वेळापत्रक, शिस्त व डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या‘पंढरपूर पॅटर्न इन सेंकडरी स्कूल एज्युकेशन’ आदी उपक्रमांमुळे उत्कृष्ठ निकाल लागला. लोट्स मधील इयत्ता १० वी ची ही पहिलीच बॅच असल्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील सर्व पालकांच्या मनात निकाला विषयी प्रचंड उत्सूकता होती. स्पर्धेच्या युगात लोट्स स्कूलचा प्रवास देखील दमदार सुरु आहे. स्वेरीच्या यशाप्रमाणेच स्वाईप (श्री. विठठ्ल इन्स्टिटयूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन) संचलित, लोटस इंग्लिश स्कूल ही उत्कृष्ठपणे प्रगतीच्या पथावर आहे. असे मत यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक व्यक्त करत आहेत.यावेळी विद्यार्थ्यांच्या या यशाबदद्ल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे, अध्यक्ष बी. डी. रोंगे, उपाध्यक्ष एच. एम. बागल, विश्वस्त दादासाहेब रोंगे तसेच लोट्सच्या प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण यांच्यासह अन्य शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले. डॉ. रोंगे यांच्या नियोजनाला प्राचार्यांसह शिक्षकवर्गाची भरीव कामगिरी यामुळे विद्यार्थ्यांना यश मिळाले. त्यामुळे सर्व विद्यार्थी यशस्वी झाल्यामुळे लोटस इंग्लिश स्कूल ची चर्चा आता जिल्ह्याबरोबरच संपूर्ण राज्यात होत आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com





0 Comments