पंढरपूर LIVE 7 Jun 2018

पंढरपूर- : कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्युट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित, लोटस इंग्लिश स्कूल, कासेगाव पंढरपूर चा झेंडा भारतात झळकवणाऱ्या नेहा कांतीलाल डुबलने ऑलिंम्पियाड फॉन्डेशन तर्फे ३० देशात घेतल्या जाणाऱ्या व भारतातील १९०४ शहरामधून आणि तब्बल ४५०० शाळामधील विद्यार्थ्यामधून इंटरनॅशनल जनरल नॉलेज ऑलिंम्पियाड या परीक्षेमध्ये दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल रविवारी दिल्ली येथील हेबिटेट सेंटर येथे एनआयटी मणीपूरचे माजी अध्यक्ष व इस्रो मधील नामवंत प्रोफेसर पद्मश्री डॉ. वाय. एस. राजन यांचे हस्ते रौप्य पदक, सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले. यावेळी सत्कार स्विकारताना नेहा डुबल, लोटस स्कूलच्या प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण, नेहाचे वडील कांतीलाल डुबल व आई सौ.विजयमाला डुबल हे उपस्थित होते. या प्रसंगी नेहा डुबलचे कौतुक करताना प्रोफेसर डॉ.वाय. एस. राजन म्हणाले की, ‘ग्रामीण भागातील मुले सुध्दा जागतिक स्तरावरील स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनत आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील शाळांचा तेथील शिक्षकांचा व पालकांचा महत्वाचा वाटा आहे. नेहा डुबलच्या या सर्वोत्तम यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे, अध्यक्ष बी. डी. रोंगे, उपाध्यक्ष एच. एम. बागल, विश्वस्त दादासाहेब रोंगे, वर्ग शिक्षिका व विषय शिक्षिका सोनम इंगळे, प्राथमिक विभागप्रमुख संपत लवटे, अन्य शिक्षकांनी व पालकांनी अभिनंदन केले.



महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile- 7972287368, 8552823399
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
0 Comments