पंढरपूर LIVE 9 July 2018
दिवेघाटाची वाट आज हजारो वारकऱ्यांनी पार केली. यावेळी वरुणराजाच्या हजेरीमुळे वारकऱ्यांचा उत्साह दुणावला होता. निसर्गाने मुक्त उधळण केलेला दिवेघाट आणि तिथून वाट काढत विठुरायाच्या दर्शनाला निघालेला वारकरी हे नयनरम्य दृश्य आज पुन्हा एकदा पाहायला मिळाले. दिवेघाटाचा अवघड टप्पा पार करताना वारकऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनीही साथ दिली.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार "कृषी पंढरी" कृषी महोत्सव-2018 "भव्य कृषी प्रदर्शन" बघा (जाहिरात)
तर दुसरीकडे पाऊले हळू हळू चाला, मुखाने हरिनाम बोला, पांडुरंग हरी, वासुदेव हरी असा विठुनामाचा गजर करत मुक्ताईनगरमधून संत मुक्ताईच्या पालखीनं प्रस्थान ठेवले. या पालखीचे बीडमध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. मुक्ताबाई दोन दिवस बीड मुक्कामी असतील. मुक्ताईची पालखी वारीसाठी तब्बल सातशे किमीचं अंतर पार करते. मुक्ताबाईच्या पालखीत जवळपास दीड हजार वारकरी सहभागी झालेयत. बीड जिल्ह्यात मुक्ताबाईच्या पालखीचे चार मुक्काम असतात. त्यापैकी शहरात दोन मुक्काम असतात. शहरात सकाळी जालना रोडवर मोठ्या उत्साहात पालखीचं आणि वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments