२० जुलै ला प्रदर्शित होणार ‘लव्ह लफडे’ चित्रपट एचसीसी नेटवर्क ऍपवर

पंढरपूर LIVE 7 July 2018



दीनानाथ घारपुरे [ मनोरंजन प्रतिनिधी ] 
 ·       ‘होम सिनेमा कॉन्सेप्ट नेटवर्क’ द्वारे आता नवीन सिनेमे पाहता येणार
·       ‘ अवधूत वाडकर’ पहिल्यांदा महत्वपूर्ण भूमिकेमध्ये झळकणार
      भारताच्या इतिहासातील पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र’ प्रदर्शित झाला. दादासाहेब फाळके यांनी परदेशात जाऊन सिनेमाचे तंत्रज्ञान शिकून भारतात हा चित्रपट तयार केला. त्यावेळेस त्यांना कदाचित कल्पना सुद्धा नसेल की त्यांनी सुरु केलेला हा उद्योगसमूह पुढे जाऊन १०० वर्षांनी १९ हजार ३०० कोटी रुपयांची उलाढाल करेल. गिरगाव येथील कोरोनेशन सिनेमा येथे हा चित्रपट सर्वसामान्य प्रेक्षकांना दाखविला गेला. ४० मिनिटांचा मूक असलेला हा चित्रपट त्याकाळी अवघ्या १० हजारात तयार झाला होता. तर या चित्रपटाने ४७ हजार रुपयांचा गल्ला जमविला होता. फिल्म इंडस्ट्रीच्या भाषेत सांगायचं तर पहिलाच भारतीय चलचित्रपट सुपरहीट ठरला होता.
दादासाहेब फाळकेच्या कलाकृतींचा वारसा जपत काही तरुणांनी एकत्र येऊन लव्ह लफडे’ नावाचा चित्रपट तयार केला आहे. मात्र हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित न होता एचसीसी नेटवर्क मोबाईल ऍप वर प्रदर्शित होणार आहे. अशाप्रकारे एचसीसी नेटवर्क मोबाईल ऍपवर प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट असेल. भविष्यातील चित्रपट प्रदर्शनाची ही एकप्रकारे नांदी आहे असे म्हटल्यास चूक ठरणार नाही.
चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन आंबात यांनी केले आहे. तर कथा-पटकथा संजय मोरे यांचे आहे. सलग मोशन पिक्चर्सच्या गीता कुलकर्णी आणि सॅक्रेड बुद्धा क्रिएशनचे सुमेध गायकवाड यांची संयुक्त निर्मिती आहे. रोहित फाळके आणि रुचिरा जाधव हे चेहरे आहेत तर अभिनेता सुमेध गायकवाड आणि अभिनेत्री मोनिका दबडे मुख्य भूमिकेत या चित्रपटात झळकणार आहे. त्यांच्यासोबत या चित्रपटात समीर चौघुलेनयन जाधवअवधूत वाडकर,संजय मोरेकल्पेश सातपुतेभाग्येश केम्भवी व कुणाल शिंदे आदी कलाकार दिसणार आहेत.
तरुणाईने सजलेल्या या चित्रपटाला संगीत देखील तरुणाईला साजेसंच आहे. प्रसिद्ध संगीतकार प्रवीण कुंवर आणि अनय नाईक यांनी तरुणांना मंत्रमुग्ध करेल असे संगीत दिले आहे. या गीतांना तरुणांचा आवाज म्हणून ओळखला जाणारा अवधूत गुप्तेमंगेश बोरगावकरमुग्धा कऱ्हाडेरोहित राऊतभारती मढवी  या ताज्या दमाच्या गायकांनी स्वरसाज चढविलेला आहे.
हा चित्रपट २० जुलै २०१८ रोजी एचसीसी नेटवर्क या मोबाईल ऍपवर प्रदर्शित होणार आहे.
(चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये – रोहित फाळके, रुचिरा जाधव,सुमेध गायकवाड, मोनिका दबडे, अवधूत वाडकर मुख्य भूमिकेत या चित्रपटात झळकणार आहेत.)



  











महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments