पंढरपूर LIVE 8 July 2018
पंढरपूर (प्रतिनिधी):- संत गाडगे महाराज चोखामेळा विद्यार्थी वस्तीगृह गौतम विद्यालय, पंढरपूर येथील इयत्ता 5 वी ते 10 वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांना संपुर्ण शैक्षणिक साहित्य व क्रिडा साहित्याचे वाटप केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. पंढरपूरमधील जय भिम तरुण मंडळाचे आधार स्तंभ व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) चे पंढरपूर शहराध्यक्ष संतोष पवार यांनी यावर्षी च्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन याच पैशाचा विनियोग गरजु विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करत हा स्तुत्य उपक्रम राबविला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने होणार्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन आम्ही ‘‘समाजातील गरजु विद्यार्थ्यांना संपुर्ण शैक्षणिक साहित्य व क्रिडा साहित्य देण्याचा निर्धार केला होता तो आज साकारला.’’ अशी भावना यावेळी आपल्या प्रास्ताविकात संतोष पवार यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना ना. रामदास आठवले म्हणाले की, ‘‘भारत देशाला मजबुत करण्याचं काम आपणा सर्वांना करायचं आहे व ते करण्यासाठी समाजातील भावी पिढीला शिक्षणामध्ये अग्रेसर रहाणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येकाला शिक्षण देण्यासाठी आपणास प्रयत्न करायचे आहेत. आपल्या शोषीत वंचीत समाजाला शिक्षणाचं महत्व जाणुन घ्यायचं असेल तर डॉ. बाबासाहेबांनी शिक्षण घेण्यासाठी घेतलेले खडतर परिश्रम स्मरणात ठेवणं आवश्यक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिवसभर काम करुन रात्री अभ्यास केला. आज जय भिम तरुण मंडळाने राबविलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. समाजातील गरजु विद्यार्थ्यांना एक- दोन वह्या व पेन देणारे अनेक असतील परंतु संपुर्ण शैक्षणिक साहित्य व त्यासोबतच संपुर्ण क्रीडा साहित्य देण्याचं बहुमोल काम या मंडळाचे आधारस्तंभ व आमचे कार्यकर्ते संतोष पवार यांनी केलंय याचं खुप समाधान वाटलं. एम.बी.बी.एस. च्या तिसर्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या प्राजक्ता क्षिरसागर या विद्यार्थिनीचा एक वर्षाचा संपुर्ण शैक्षणिक व वस्तीगृहाचा खर्चही जय भिम तरुण मंडळाने केला आहे. ही बाब वाखाणण्याजोगी आहे. समाजाकडून घेत असताना समाजाला देण्याची अशी ‘दानत’ सर्वांनी अंगी बाळगावी. व जयंती निमित्त केल्या जाणार्या अनावश्यक खर्चाला फाटा देऊन समाजाची भावी पिढी सर्वांगाने सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करावेत.’’ अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) चे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस राजाभाऊ सरवदे हे होते. यावेळी आय.पी.एस. अधिकारी निखील पिंगळे, अप्पासाहेब जाधव, सुनील सर्वगोड, बाळासाहेब कसबे, अशोक सरवदे, जितेंद्र बनसोडे, कैलास कांबळे, समाधान लोखंडे, दयानंद बाबर, कुमार भोसले, संतोष सर्वगोड, रौनक शहा, पीएसआय संतोष इंगळे, लक्ष्मण कांबळे, दिपक चंदनशिवे, गौतम विद्यालयाचे प्राध्यापक दोडके सर, वस्तीगृहाचे अध्यक्ष वाघमारे सर, प्रविण मोरे, हेमंत रणपिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जय भिम तरुण मंडळाचे बाळासाहेब सर्वगोड, विक्रम पवार, योगेश चंदनशिवे, अमित पवार, बाळु (सतीश) सर्वगोड, बापु माने, अजिंक्य ओहाळ, सौरभ सुळे, शुभम ठोकळे, रोहित ताठे, सुमित वाकडे, दत्ता चांडोले, संघराज इंगळे, निलेश जाधव, सचिन जाधव, उदय मुळे, सौरभ मुळे, राहुल निकाळजे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com

0 Comments