नागपूर-पावसाळी अधिवेशनात आमदार भालके यांनी फोडली जेष्ठ नागरिकांच्या प्रश्‍नांना वाचा

पंढरपूर LIVE 9 July 2018

जेष्ठ नागरिकाबाबत समस्याना वाचा फोडली वय झाल्यानंतर अनेकांना व्याधिना तोंड द्यावे लागते अनेकांना वृद्धश्रम गांठावे लागते उतार वयात होणाऱ्या या मानसिक कुचंबनेने अनेकांनी आपले जीवन संपवले यावर शासन स्तरावर ज्या  उपाय योजना आहेत त्यावर ग्रामीण महाराष्ट्र वंचित आहे म्हणून आ भारत भालके यांनी  ज्येष्ठांच्या समस्या(प्रश्न) मांडल्या 

त्यात २००४ व२००७ साली महाराष्ट्र सरकारनं जेष्ठ नागरिकांसाठी कायदे केले.त्या कायद्यांची अंमलबजावणी ख-या अर्थानं सरकारनं २००९ सालापासून सुरु केली आहे.त्या कायद्याप्रमाणे कांही निराधार जेष्ठांना कांही मदत पैशाच्या स्वरुपात देऊ केलेली होती.अशा रकमा आत्तापर्यंत सरकारने किती जेष्ठांना दिल्या? व किती द्यायच्या प्रलंबित आहेत असा प्रश्न मांडला 
शिवाय महापालिका क्षेत्रात जेष्ठांना ज्या सोयी सुविधा सरकारकडुन दिल्या जातात. त्या सोयीसुविधा ग्रामीण जेष्ठांना का दिल्या जात नाहीत? उदा.ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रे, नाना-नानी पार्क,ज्येष्ठांना उपचारात २०टक्के सवलत,औषधात सवलत इत्यादी सुविधा ग्रामीण भागात मिळाल्या पाहिजेत अशी मागणी केली  शेतकरी,शेतमजूर,कागार,कष्टकरी,कलाकार यांना वय वर्षे ६०नंतर पेन्शन योजना लागु करण्यासंबधी सरकारकडे कांही ठोस योजना विचाराधीन आहे का? असा प्रश्न सभागृहात विचारुन सबंध राज्याच्या या व्यथेला वाचा फोडण्याचे काम केले 
या वर  राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बड़ोले यांनी संबन्धित विभागाकडून निश्चित आकडेवारी उपलब्ध करीत संपूर्ण राज्याला ह्या सवलती लागू केल्या जातील असे आश्वासन त्यानी दिले

आंदोलनाची दखल..... 
सांगली येथील हजारो जेष्ठ नागरिकांनी ३ जुलै रोजी पंढरपुर येथील विठ्ठल मंदिराजवळ  आंदोलन केले होते भक्त पुण्डलिकाच्या पायथ्याशी आपणाला सहारा मिळेल या भावना लक्षात घेणे आवश्यक आहे आंदोलनात त्यानी इच्छा मरणाला परवानगी मागितली एवढा अन्याय जर ज्येष्ठाना सहन करावा लागत असेल तर यावर तात्काळ भूमिका घ्यावी लागेल असे आ भारत भालके यांनी लक्षवेधी मध्ये निक्षुण सांगितले



  











महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments