बेरोजगार भुमिहीन मजूर व असंघटीत कामगार संघटनेच्या पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी अरविंद कांबळे तर जिल्हा सरचिटणीसपदी तानाजी चौगुले

पंढरपूर LIVE 13 आॅगस्ट  2018

नंदेश्वर /प्रतिनिधी ः 
बेरोजगार भुमिहीन मजूर व असंघटीत कामगार संघटनेच्या पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी अरविंद कांबळे तर जिल्हा सरचिटणीसपदी तानाजी चौगुले यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय रणदिवे यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. 

यावेळी अरविंद कांबळे यांनी सांगितले की, ही संघटना सुशिक्षित बेरोजगार युवक युवतीनां त्यांच्या योग्यतेनुसार रोजगार उपलब्ध करुन देण्यात यावा किंवा 12000/ बेरोजगार भत्ता मिळावा,  भुमिहिना नां किमान 2 हेक्टर जमीन उपलब्ध करुन द्यावी, असंघटीत क्षेत्रातील प्रत्येक क्षेत्रातील कामगारांना रोजंदारीचा रास्त दर जाहीर व्हावा, कामगारांना 50 वर्षानंतर सन्माननीय निवृती  मिळावी, निवृतीनंतर किमान 9000 /- रू. निवृत्ती वेतन मिळावे, दारिद्र्य रेषेखालील  जनतेला सत्वर मोफत घरकुल बांधून देण्यात यावी, कामगारांकडे असनारी सर्व महामंडळाची कर्जे माफ करणेत यावीत, विद्यार्थी आणि विद्यार्थीनीची शिष्यवृती वेळेवर देण्यात यावी, शासकीय आणि निमशासकीय रिक्त जागा  त्वरीत भरणेत याव्यात तसेच शासकीय कार्यालयात कॅान्ट्रॅक्ट बेसीक वर भरण्यात येणार्‍या कर्मच्यार्‍यांना देणेत येणार्‍या तुटपुंज्या (5000/-) (पेमेेंट) वेतनात वाढ करुन त्यांना भविष्यात शासकीय सेवेत सामावून घेणेबाबतची भुमिका स्पष्ट करणेत यावी, सुशिक्षित बेरोजगार  व असंघटीत क्षेत्रातील कामगारांना शासकीय योजनांचा लाभ त्वरीत मिळावा, बांधकाम कामगार वर्गासाठी कामगार कार्यालयात 90 दिवस काम केलेची नोंदणी करण्याची जाचक अट रद्द आहे  करणेत यावी, बेकायदेशीरपणे गेल्या 15 ते 20  वर्षापासून खाजगी सावकारी करणारे खाजगी सावकारावर त्वरीत कारवाई करुन असंघटीत  क्षेत्रातील कामगांर व शोषित घटकाला या कर्जातुन मुक्त करून त्यांच्या सावकाराकडे गहाण पडलेल्या जमीनी त्वरीत मिळवून देणेत याव्यात,  महिला-भगीनीच्या सुरक्षेसाठी अत्यंत कडक कायदा करण्यात यावा, बहूजन समाजातील अल्पसंख्यांक जाती जमातींना टार्गेट करुन जातीय सलोखा भंग करुन सामाजिक शांतता धोक्यात आणणार्‍या प्रवत्तीचा बिमोड करण्यासाठी सखोल चोकशी होऊन दोषीवर कठोर कारवाई व्हावी, इत्यादी मागण्या घेऊन बेरोजगार कामगार संघ शासन दरबारी लढणार आहे.



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments