वकीलांचा व पोलिसांचा वाद.... आज पंढरपूर न्यायालयाचे कामकाज ठप्प... उद्या सोलापूर जिल्ह्यातील सर्व वकील कामकाजापासून राहणार अलिप्त..?

पंढरपूर LIVE 13 आॅगस्ट  2018


पंढरपूर न्यायालयाचे कामकाज वकील व पोलिसांमधील वादामुळे आज रिमांड व्यतिरिक्त पुर्णपणे ठप्प झाले होते. उद्या संपुर्ण सोलापूर जिल्ह्यातील वकील कामकाजापासून अलिप्त रहाणार असल्याची घोषणा अधिवक्ता संघाने केल्याचे समजते. त्यामुळे उद्या सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश न्यायालयातील कामकाज ठप्प राहील की काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

मराठा आरक्षण आंदोलनावेळी एसटी बसेस फोडण्याच्या गुन्ह्याखाली आरोपी म्हणून अटक केलेले अ‍ॅड. संतोष भोसले यांना दि. 11-8-2018 रोजी पंढरपूर अधिवक्ता संघातील अध्यक्ष व सदस्य कायदेशीर बाबीसंबंधी चर्चा करण्यासाठी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गेले असताना त्यांना तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी अपमानास्पद वागणुक दिली असा आरोप अधिवक्ता संघाचे अध्यक्ष व सदस्य यांनी पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यावर केला आहे. तर ‘‘मी असे वागलोच नाही!’’ असे पोलिस निरीक्षक जाधव यांचे म्हणणे आहे. 

आज दिवसभर वकील व पोलिसांच्या या वादामुळे पंढरपूर न्यायालयाचे कामकाज रिमांडव्यतिरिक्त पुर्णपणे ठप्प होते. उद्या पंढरपूरसह संपुर्ण सोलापूर जिल्ह्यातील न्यायालयांचे कामकाजापासून अलिप्त रहाण्याचा निर्णय पंढरपूर अधिवक्ता संघाने घेतल्याचे समजते. त्यामुळे जर सोलापूर जिल्ह्यातील वकील मंडळींनी उद्या दि. 14 ऑगस्ट रोजी कामकाजापासून अलिप्त रहाण्याचा निर्णय घेतलाच तर उद्या संपुर्ण सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश न्यायालयांचे कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.

याबाबत आज पंढरपूर कोर्टामध्ये बर्‍याच घडामोडी घडला असल्याचे समजते. रिमांडची सुनावणी चालु असताना एका साध्या वेशातील पोलिसाने आपला मोबाईल काढून कोर्टाचे परवानगीविना व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचा संशय कांही वकील मंडळींना आल्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला. गोंधळाची परिस्थिती पाहून त्या पोलिसाने तेथून पलायन केले. नंतर संबंधित पोलिसाला अनेक वकील मंडळींनी बोलावून घ्या व त्यांचा मोबाईल जप्त करा अशी मागणी केली. यानंतर संबंधीत पोलिस कर्मचारी कोर्टात हजर राहिला असल्याचे समजते.



  





महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com

Post a Comment

0 Comments