लोकसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यातील निवडणुक प्रक्रिया आज दि. 18 एप्रिल रोजी पुर्ण झाली असून आज मतदारांचा कौल इव्हीएम मशिनमध्ये बंद झाला आहे. महाराष्ट्र राज्यात दुसर्या टप्प्यात एक कोटी 85 लाख 46 हजार मतदारांना आज आपला मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळाली. दुसर्या टप्प्यात एकुण 179 उमेदवार असुन, 20 हजार 716 मतदान केंद्रे आहेत. यापैकी 2100 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट होणार होते.
बीड मतदार संघात 36 उमेदवार, बुलढाणा मतदार संघात 12 उमेदवार, अकोला मतदार संघाात 11, अमरावती 24, हिंगोली 28, नांदेड 14, परभणी 17, उस्मानाबाद 14 तर सोलापूर मतदारसंघातील 13 उमेदवारांचे भवितव्य आज इव्हीएम मशिन्समध्ये सीलबंद झाले. आज दुपारी 5 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार सोलापूर जिल्ह्यात सरासरी 52% मतदान झाले.
सोलापूर जिल्ह्यातील 5 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी खालीलप्रमाणे:


देशातील 11 राज्य आणि केंद्रशासित पुद्दचेरी मिळून 95 जागांसाठी आज मतदान झाले. तामिळनाडुत लोकसभेच्या 39 मतदारसंघांपैकी 38 जागांवर, विधानसभेच्या 18 जागांसाठीही मतदान प्रक्रिया पार पडली. वेल्लोर मतदार संघात मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्यामुळे निवडणुक रद्द करण्यात आली. या टप्प्यात 1,600 उमेदवार रिंगणात आहेत. कर्नाटकातील 14, उत्तर र्पदेशातील आठ, असाम, बिहार व ओडिसातील प्रत्येकी 5, छत्तीसगड व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी तीन, जम्मु काशि्मरातील दोन आणि मणिपुर, पुद्दचेरीखतील प्रत्येकी एका जागेचा मतदानात समावेश आहे. विधानसभेच्या 35 जागांसाठीही उद्या मतदान होईल.
मतदान केंद्रावर चांगल्या सुविधा: निवडणुक ाायोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, सावलीची व्यवस्था, सखी मतदान केंद्र अशा सुविधा उपलब्ध केल्या होत्या. 10 टक्के मतदान केंद्रावरील मतदान केंद्राचे लाईव्ह वेबकास्ट केले जाणार असून जिल्हा निवडणुक अधिकारी, राज्यस्तरीय मुख्य निवडणुक अधिकारी आणि भारत निवडणुक आयोगाचे अधिकारी संबंधित मतदार संघाचे केंद्रीय निवडणुक निरीक्षक हे लाईव्ह वेबकास्ट पाहतील.
मतदान याद्यांचा घोटाळा:
अनेक मतदारांची नांवेच मतदार यादीतून गायब झाली असल्याच्या तक्रारींसोबतच पतीचे एकीकडे तर प;त्नीचे नांव इतर कुठल्यातरी मतदान केंद्राकडे अशा तक्रारीही ऐकण्यात आल्या आहेत. मतदानाच्या स्लीप अनेक मतदारांना घरपोहोच मिळाल्या नसल्याच्या तक्रारीही ऐकावयास मिळाल्या. ऑनलाईन मतदार यादीत स्वत:चे नांव शोधणे सर्वांनाच जमेल असे नसल्यामुळे अनेक मतदार मतदान केंद्र्ापर्यंत जावुनही मतदान न करताच माघारी वळल्याची चर्चा कांही मतदान केंद्रावर सुरु होती.


0 Comments