महाराष्टासह कर्नाटक राज्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग
तबला या विषयाचा सोलापूर जिल्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक प्रसार व प्रचार करणारया आणि आंतराष्ट्रीय दर्जाचे बाल व युवा तबला वादक घडविणारया पंढरपुरातील सुप्रसिद्ध तबला वादक व गुरु पं.दादासाहेब पाटील यांच्या श्री.कलापिनी संगीत विद्यालय व श्रीसंत तनपुरे महाराज संगीत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तबला विषयातील जागतिक दर्जाचे उच्च विद्वान पंडित उमेश मोघे यांची तीन दिवसीय तबला वादन कार्यशाळा श्रीसंत तनपुरे महाराज मठ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.यावेळी सोलापूर,पुणे सह विजापूर,धारवाड,बडोदा अशा विविध भागातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.तिश्र त्रिताल,तिश्र झपताल व तिश्र रूपक हा या कार्यशाळेचा विषय होता.त्यासोबतच तबला वादनातील विविध बोलांचा अभ्यास,निकास,पाठांतर,वेग, सोंदर्यशास्त्र,रचनांचा विस्तार व त्याचे नियम,लयकारी अशा विविध महत्वपूर्ण विषयावर पं.उमेश मोघे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.अगदी 6 वर्षाच्या मानस ढाळे या लहानमुलापासून ते बडोदा येथून आलेले 70 वर्षीय श्रीकांत फाटक अशा विविध वयातील तबला शिकू इच्छिणारयांनी व याविषयात व्यावसायिक कलाकार म्हणून घडू इच्छिणारयांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.

प्रत्येकांना स्वतंत्र व वैयक्तिक मार्गदर्शन घेता येईल याची काळजी नियोजक पं.श्री.दादासाहेब पाटील ,अविनाश पाटील,व श्री.विकास पाटील यांनी घेतली होती.अशा कार्यक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्चस्तरीय ज्ञान मिळाले आहे व यासाठी कलापिनी संगीत विद्यालयाचे कार्य निरंतर चालू आहे असे मत पालक प्रतिनिधी म्हणून विक्रम बिस्कीटे व वैजिनाथ रणदिवे यांनी व्यक्त केले.यावेळी विकास पाटील यांनी कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी अत्यंत सुंदर व अर्थपूर्ण शब्दात तबला वादन विषयात गुरूचे स्थान याविषयी पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तर दादासाहेब पाटील यांनी पं.मोघे सरांसारखे व्यक्ती असल्याने शास्त्रीय संगीतात उच्चस्तरीय कार्य जिवंत आहे असे मनोगत व्यक्त केले.तर पं.उमेश मोघे याप्रसंगी विद्यार्थ्यांचा एवढा मोठा उत्साह हल्ली पुण्यातही मिळत नाही ,पण इथे एवढे सुंदर वातावरण तयार आहे की हेच खरे गुरुपरंपरेचा आदर्श व सत्य आहे.विकास पाटील यांच्या कार्याबद्दल ऐकुन होतो पण गेली तीन दिवस स्वत: अनुभवतोय की अतिशय गुणी,संस्कारी,लयबद्ध,तालबद्ध,आज्ञाधारी व तबला वाद्यावर जिवापाढ प्रेम करणारी मुलं इथे घडत आहेत.त्यामूळी खरी पांडुरंगाची सेवा ते करित आहेत असे वाटते.यावेळी मोठ्याप्रमाणात पालकही उपस्थित होते. सर्व पालकांनी कलापिनी संगीत विद्यालयाचे व नियोजकांचे आभार मानले.
0 Comments