तिसंगी (प्रतिनिधी)- पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथील मोहन रजपूत यांच्या विहिरीमध्ये काल दि. ३ एप्रिल रोजी दुपारी १ ते २ च्या दरम्यान अंदाजे ४५ ते ५० वयोमान असलेल्या अज्ञात महिलेचे प्रेत आढळून आले. गावच्या पोलिस पाटलांनी ही घटना पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
काल दुपारी ५ ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास सदर महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. सदर महिलेच्या अंगावरील स्टोनमध्ये (रुमाल) २० रु. च्या ४ नोटा, १० रु.ची १ नोट व ५ रू. चे १ नाणे असे एकूण ९५ रूपये आढळून आले आहेत. साधारण ४ ते ५ दिवसांपूर्वी ही महिला विहीरीत बुडली असावी. अधिक तपास पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे एएसआय आटपाडकर हे करत आहेत.
या महिलेने आत्महत्या केली की तिचा खुन झाला याबाबतचे गुढ कायम आहे.
-------------------------------------------------------


0 Comments