अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या प्रवेशासाठी सी.ई.टी सेल मार्फत सराव परीक्षा
पंढरपूरः- बारावी परिक्षेनंतर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, फार्मसी व वैद्यकीय विभागात प्रवेश कसा मिळेल ? याचे वेध लागते आणि यासाठी जणू ही एक स्पर्धाच सुरु होते. शासनाच्या एम.एच.टी.-सी.ई.टी. २०१९ परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षेचा सराव व्हावा म्हणून शासनानेच ठरविलेल्या सराव परीक्षा उद्या सोमवार दि. २२ एप्रिल २०१९ रोजी सकाळी १० वाजल्या पासून स्वेरीमध्ये एक-एक तासाच्या चार वेगवेगळ्या स्लॉटमध्ये होणार आहे. याचा फायदा बारावी (सायन्स) परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी घ्यावा.’ असे आवाहन श्री.विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूरचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी केले.

अभियांत्रिकी व फार्मसीमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारी राज्य शासनाची मुख्य एम.एच.टी.-सी.ई.टी.२०१९ ही परीक्षा साधारण दि.२ मे ते दि.१३ मे २०१९ दरम्यान होणार असून श्री. विठ्ठल अभियांत्रिकीच्या मोफत ऑनलाईन रजिस्टेशनच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतला आहे. आता त्या परीक्षेचा सराव व्हावा या हेतूने शासनाने सराव परीक्षेसाठी देखील स्वतंत्र रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सोमवार (दि. २२ एप्रिल २०१९) सकाळी १० पासून स्वेरीमध्ये होणार आहे. यासाठी पूर्ण चार्जिंग केलेला अँड्रॉईड मोबाईल हँडसेट आवश्यक असणार आहे. यासाठी रु. २५/- परीक्षा फी असणार आहे. परीक्षार्थ्यांनी वेळेपेक्षा एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित असणे आवश्यक आहे. या सराव परीक्षेच्या सुवर्णसंधीचा लाभ बारावी (सायन्स) परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे. या सराव परीक्षा प्रक्रीयेबाबतच्या अधिक माहितीसाठी प्रा. यु.एल. अनुसे (मोबा. ९१६८६५५३६५), प्रा.पी.जी. गायकवाड (मोबा. ७०५७५१६९०३) व टोल फ्री क्र. १८०० ३००० ४१३१ यावर संपर्क साधावा’ असे आवाहन अभियांत्रिकी (पदवी) प्रवेश प्रक्रीयेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस. कचरे यांनी केले आहे.


0 Comments