भोसे (क.) : वार्ताहर, खेडभोसे येथील युवा क्रिकेट संघाने परिसरातील हाफ पीच क्रिकेट स्पर्धांमध्ये दैदिप्यमान यश मिळवलेले आहे. आत्तापर्यंत या संघाने 8 पदके मिळविलेली आहेत या यशाबद्दल या संघाचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
क्रिकेट संघातील गणेश तनपूरे , धनाजी कोळी , निलेश पवार, समाधान पवार , माऊली माने , बापू झांबरे , आप्पा पवार , सुनील जमदाडे , पवन भोसले , नागनाथ पवार आणि सज्जन पवार या खेळाडूंचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नागरिक सेलचे पंढरपूर तालुकाध्यक्ष महादेव पाटील, उपसरपंच सुरेश पवार, हणमंत पवार, पांडुरंग पवार, सत्यवान पवार, क्रीडा शिक्षक भारत झांबरे, बंडू पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सोसायटी सदस्य नागनाथ पवार, सचिन पवार, तानाजी पवार, दत्ता पवार, सागर पवार, पंपू पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





0 Comments