पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील 7 विद्यार्थ्यांची विविध कंपनीत कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड करण्यात असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
अल्पावधितच नावलौकिक संपादित करून अभियांत्रिकी शिक्षणाची गुणवत्ता, जगातील नामांकित कंपनीत विद्यार्थ्यांना नोक-या देऊन पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महावि7द्यालयाने अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात एक दबदबा निर्माण केला आहे. विद्यार्थ्याच्या हिताचे शिक्षण देऊन पालकांच्या विश्वासास पात्र असलेले पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग कॉलेज मधील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील अॅटॉस सिंटेल कंपनीत धनश्री भोसले, टेक्नोविंग्ज कंपनीत पूजा लेंगरे, स्पीड टेकसर्व कंपनीत गणेश मिसाळ तर 777 रिर्सच कंपनीत भाग्यश्री जाधव, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील जिनियस सिस्टिम कंपनीत शुभम मोटे तर झायकॉन कंपनीत शिवगणेश डोंबे, पी.डब्ल्यू. डी मध्ये सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील सारिका महारनवर आदी विद्यार्थ्याची पंढरपूर सिंहगड कॉलेज मध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड करण्यात आली आहे.
या निवडी दरम्यान कंपनी कडून घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये विद्यार्थ्याची बौद्धिक व तांत्रिक चाचणी घेण्यात आली. यावेळी सिंहगड अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची कमालीची शिस्त, समर्पक, योग्य व अचूक उत्तरे दिल्यामुळे कंपनीच्या अधिकारी समाधानी झाले. कंपनीत आवश्यक असलेले गुण पंढरपूर सिंहगड मधिल विद्यार्थ्याकडे दिसून आले. या निवडीमुळे विद्यार्थी व पालक वर्गात उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.
कंपनीत प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, डॉ. चेतन पिसे, डॉ. रविंद्र व्यवहारे, डॉ. श्याम कुलकर्णी, प्रा. नामदेव सावंत, प्रा. श्रीनिवास गंजेवार, डॉ.अल्ताफ मुलाणी, प्रा. सोमनाथ कोळी, प्रा. सुर्यकांत पाटील आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.






0 Comments