श्री विठ्ठल अभियांत्रिकी महविद्यालयात एम.बी.ए.च्या प्रवेशाकरिता प्रचंड गर्दी

ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची उद्यापर्यंत मुदत
पंढरपूरः शैक्षणिक वर्ष २०१९-२० करीता महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा मार्फत सुविधा केंद्राला (केंद्र क्र.६२२०) मान्यता मिळाली असून पदव्युत्तर पदवी एम.बी.ए.च्या प्रथम वर्ष प्रक्रियेला सुरवात झाली असून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची मुदत उद्या गुरुवार (दि ४ जुलै) पर्यंत आहे. नेहमीप्रमाणे एम.बी.ए. प्रवेश प्रक्रियेला कमी अवधी दिला असल्यामुळे एम.बी.ए. चे शिक्षण घेण्यासाठी स्वेरीमध्ये प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे इच्छुकांनी रजिस्ट्रेशन करून घ्यावे असे आवाहन  माहिती श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. पी. रोंगे यांनी दिली.
           

गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेषन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात पदव्युत्तर पदवी शिक्षण असलेल्या एम.बी.ए.च्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया दि.३० जून पासून सुरु झाली असून ते ४ जुलै पर्यंत चालणार आहे. यासाठी  प्रथम वर्ष एम.बी.ए. साठी स्वेरीत मोफत नाव नोंदणी, कागदपत्रे पडताळणी, कागदपत्रे खात्री करणे आदी सुविधा उद्या ४ जुलै २०१९  सायं.पाच वाजेपर्यंत केली असून यासंबंधी अधिक माहितीसाठी एम.बी. ए. चे विभागप्रमुख प्रा. करण पाटील (मोबा.क्र. ९५९५९२११५४) व प्रा. एस.ए. जगताप (९१६८६५५३८६)  या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
छायाचित्रः- श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट पंढरपूरचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे.व एम.बी.ए. चिन्ह. व एम.बी.ए. विभागप्रमुख प्रा. करण पाटील.



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments