स्वेरीत स्पर्धा परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पंढरपूर- ‘एम.पी.एस. सी., यु.पी.एस.सी. अथवा स्टाफ सिलेक्शन अशा विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर अभ्यासाबरोबरच दररोजचे वृत्तपत्र वाचन करणे अत्यंत गरजेचे आहे. वृत्तपत्राच्या माध्यमातून दररोजच्या घडामोडीसंबंधी अपडेट्स मिळतात. स्पर्धा परीक्षेतील यश हे वृत्तपत्रातील सातत्याने केलेले वाचन यावरच देखील अवलंबून असते. सामान्यज्ञान बरोबरच अपडेट माहिती जाणण्यासाठी वृत्तपत्र महत्वाची भूमिका बजावतात.’ असे प्रतिपादन युनिक अॅकॅडमीच्या सोलापुर केंद्राचे संचालक परशुराम शिंदे यांनी केले.
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षांचे स्वरूप व त्यासाठी आवश्यक माहिती याबाबत स्पर्धा परीक्षा बाबत युनिक अॅकॅडमीचे संचालक शिंदे हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धा परीक्षेचे महत्व,त्यासाठी असणारी पात्रता, परीक्षेचे स्वरूप आदी सविस्तर माहिती देत होते. प्रारंभी ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. माधव राऊळ यांनी पाहुण्यांचे स्वागत करून कंपनी बरोबरच स्पर्धा परीक्षेत देखील स्पर्धा वाढत असून केवळ मार्गदर्शना अभावी अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत पात्र असतानाही प्रशासकीय सेवेपासून वंचित राहतात.
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या पाहुण्यांची व स्पर्धा परीक्षेची माहिती दिली. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे प्रमुख प्रा. यशपाल खेडकर यांनी स्वेरीमध्ये संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकीच्या तिसऱ्या व अंतिम वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गेल्या चार वर्षापासून सुरु आहे. स्पर्धा परीक्षेबाबत सुरु असलेल्या या मार्गदर्शन केंद्राची संपूर्ण माहिती प्रा.खेडकर दिली. पुढे मार्गदर्शन करताना युनिकचे संचालक शिंदे म्हणाले,’ युपीएससी परीक्षेत प्रिलीयम, मेन्स असे मुख्य दोन परीक्षा असतात आणि त्यातील प्रिलीयममध्ये जी.एस. (जनरल स्टडी) आणि सी. सॅट (सिव्हील सर्व्हिसेस अॅप्टीट्यूट टेष्ट) आणि इंटरव्यूव्ह असे स्वरूप असते, एम.पी.एस. सी. परीक्षेमध्ये देखील असेच स्वरूप असते, परंतु त्यात सन २०१२ पासून थोडा बदल केला आहे.
________________________________________________________________________________
Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
तसेच स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक गुण, त्याचा अभ्यासक्रम, गुणांची विभागणी कशी असते? हे सांगून आय.सी.एस.चे आय.ए.एस. का झाले? याबाबत सविस्तर माहिती देवून परिक्षा अभ्यासक्रम, परिक्षा गुणदान पद्धती, अभ्यास करतानाचे नियोजन आदी संबंधित बाबींवर महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. प्रा. खेडकर म्हणाले की, ‘स्पर्धा परीक्षेच्या यशस्वीतेत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढला असून स्पर्धा परीक्षेमध्ये संयम, धीर आणि स्वभाव याचीच कसोटी होत असते.
________________________________________________________________________________
म्हणून वरील तीन गुणांची काळजी घेणे गरजेचे आहे. अलीकडे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या सहभागाचा टक्का वाढत आहे. यासाठी कठोर परिश्रमाला उत्तम मार्गदर्शनाची पार्श्वभूमी महत्वाची आहे. भविष्यात आपल्या सहकार्याने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात आयोजन केले जातील.’असे सांगितले. मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन संचालक शिंदे यांनी केले. यावेळी अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्रा. स्वप्नील पाटील, प्रा.युनूस पटेल, प्रा, ए. बी. कोकरे यांच्यासह प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------




0 Comments