परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी अपंग व्यक्तींना सर्वोतोपरी मदत करण्याचे वचन दिले होते. त्या वचनाची पूर्ती ना.धनंजय मुंडे यांनी तिसऱ्या टप्प्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील 5 टक्के निधीतून 500 अपंगांच्या खात्यात नगर पालिकेमार्फत प्रत्येकी 1 हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती नगर परिषदचे मुख्याधिकारी डॉ अरविंद मुंडे यांनी दिली. या निधी वाटपाचे ना.धनंजय मुंडे यांचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडें यांनी आभार मानले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, नगर परिषदच्या वतीने 500 अपंगांना प्रत्येकी 1000 रु. निधी मंजुर झाला असुन विधान परिषद विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी विशेष लक्ष देऊन हा निधी मंजुर केला आहे. यानिधीचे दि.01 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण होणार असुन या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन नगराध्यक्षा सौ.सरोजनी हालगे यांची उपस्थितीत राहणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांनी अपंग कल्याण निधी देणे आवश्यक असते पण सर्वसाधारणपणे असे होताना दिसत नाही. मात्र, परळी वैजनाथ नगर परिषद यांस अपवाद ठरली आहे. ना.धनंजय मुंडे यांनी नगर परिषदेस निर्देश दिले आणि त्यानुसार अपंगांच्या खात्यात प्रत्येकी हजार रुपये वर्ग करण्याचा हा तिसरा टप्पातून होणार आहेत. थेट अपंग व्यक्तींना यांचा लाभ होणार असल्याची माहिती परळी नगर परिषदचे मुख्याधिकारी डॉ.अरविंद मुंडे यांनी दिली आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
विधान परिषदेचे ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतुन हा महत्त्वकांक्षी निर्णय अंमलात येत आहे. राज्यासह मराठवाड्यातील सर्व बीड जिल्ह्यातील दुष्काळा जन्य परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळें अपंग लाभार्थ्यांना दुष्काळात दिलासा मिळणार असल्यामुळे अपंगांचे चेहर्यावर आनंद दिसत होता.
दरम्यान साजन लोहिया, सय्यद सुभान, रंजित रायभोळे, शेख फेरोज, शेख कादर,अनंतराव लोखडे, दशरथ सुत्रावे, अनंत बापु मुंडे, उध्दव फड, माणिक जाधव, संतोष आघाव, संजय नखाते, संदेश कापसे, नागरगोजे आशा, सरताज खान, शेख रहिम, आसेफ खान, निलाबाई भद्रे, पुष्पा कांबळे, नंदकुमार जोशी, प्रदिप भोकरे, शेख.सिंकदर, मनोज नाथानी, राम वलवार, विमर धुमाळ, अरिहंत लोढा, विमल निलंगे, दत्ता काटे, अविनाश फड, शेख मिया, संतोष बल्लाळ, अभिजीत जगतकर, चंद्रकात होलबोले, ममता बद्दर, महादेव राऊत, बालाजी शहाणे, प्रमोद आबाळे , कपिल जाजू, तुळशिराम प्रयाग, अपंग, विधवा आणि माजी सैनिक संघटनेने ना.धनंजय मुंडेंसह सर्व मान्यवरांचे आभार मानल्याची माहिती अपंगांचे आधारस्तंभ तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडेंनी दिली.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________
0 Comments