पंढरपूर, प्रतिनिधी - डॉ.बाबा आढाव यांचे बेमुदत उपोषणाचे घोषणे नंतर, पणन मंत्र्यांनी दि. 8 ऑगस्ट रोजी, माथाड्यांचे प्रश्नावर तातडीने मंत्रालयात बैठक घेत असल्याचे घेत असल्याची घोषणा केल्यानंतर, बाबांनी आपले उपोषण तूर्त स्थगित केले असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. पणन संचालकांने डिसेंबर 2014 साली, बाजार समितीत कार्यरत तोलनाराबद्दल चुकीचे पत्रक काढून, त्यांच्या सेवा संपुष्टात आणल्या, त्यास पणन मंत्र्यांनी आठड्यातच स्थगिती दिली आणि ही स्थगिती तब्बल 4 वर्षानंतर उठवीली गेल्याने, बाजार समिती मध्ये कार्यरत मापाड्यांचे नोकरीवर गदा आली आहे. म्हणून हा संघर्ष गेले 8 महिन्यांपासून धगधगत आहे.
___________________________________________
_________________________________________________________________________________
हमाल असो वा मापाडी, तो जेव्हढे काम करेल तेवढ्याच कामाची त्यांना मजुरी मिळते हा मुळात कायदाच आहे. कोणताही प्रश्न संवाद आणि विचाराचे देवघेवितून सुटू शकतो, किंबहुना तो तसाच सुटला पाहिजे हे लोकशाही निर्णय प्रक्रियेला अभिप्रेत आहे, मात्र शासन व मंत्री संवादच साधणार नसतील तर काय? म्हणून या प्रश्नासाठी पुणे येथील भुसार बाजारातील माथाडी कामगार गेल्या सोमवार पासून बेमुदत संपावर गेल्याने हा प्रश्न अधिक चिघळला, मात्र या प्रश्नात शासन बघ्याची भूमिका घेते आहे असे लक्षात आल्यावर, बाबांना उपोषणाची घोषणा करावी लागली. मात्र डॉ. बाबा आढावांची बेमुदत उपोषणाची घोषणा झाल्या बरोबर, मंत्रालयात प्रचंड वेगाने चक्रे फिरली, व पणन मंत्र्याने पुढाकार घेवून, दि. 8 ऑगस्ट रोजी मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले.पणन मंत्री ना. शिंदे यांनी फोन वरून बाबांशी संपर्क साधला. पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती चे प्रशासक मा.देशमुख यांनी , या वयात बाबांनी उपोषण करू नये अशी विनंती केली. शासन जर संवादासाठी पुढाकार घेत असेल तर आम्ही सुरू असलेले आंदोलन व उपोषण तूर्त स्थगित करीत असल्याची घोषणा डॉ. बाबा आढाव यांनी आज केली.मात्र 8 ऑगस्ट रोजी जर शासन, सन्मान जनक तोडगा काढण्यात अपयशी ठरले तर मग मात्र क्रांती दिनापासून( दि. 9 ऑगस्ट) , बेमुदत उपोषणाला बसणार असल्याची घोषणाही बाबांनी केली ,हे पत्रकात नमूद केले आहे.
_________________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________

Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
________________________________________________________________________________

0 Comments