पंढरपूर, प्रतिनिधी- कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त कुटूंबाना काहीसा दिलासा देण्यासाठी सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने पाठविण्यात आलेल्या मदतीचा पहिला टप्पा आज कोल्हापूरात पोहच झाला. 15 हजार चादरी आणि 4 ट्रक अन्नधान्य कोल्हापूर येथील शिवसेना पूरग्रस्त सहाय्यता मदत केंद्रात जमा करण्यात आले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी पूरग्रस्त मदतीबाबत दिलेल्या निर्देशानुसार शिवसेने नेते, सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, राज्याचे जलसंधारणमंत्री प्रा. तानाजी सावंत, सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत, पृथ्वीराज सावंत यांच्या पुढाकारातून सुमारे एक कोटी रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूचे चार ट्रक कोल्हापूरला रवाना केले होते.
शिरोली पुलावर पाणी असल्याने ही मदत गरजू पर्यत पोहचविता आली नाही आज पुलावरील पाणी ओसरल्यानंतर सदरची मदत शिवसेना सहाय्यता केंद्रात जमा करण्यात आली असून तिथूनच ती वाटप केली जाणार आहे.
या मदतीमध्ये तांदुळ, तेल, डाळ, साखर, चहा आदी जीवनावश्यक वस्तू आणि चादरी आहेत.
सोलापूर जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ढोंगे-पाटील, माजी शहरप्रमुख संदीप केंदळे, नितीन शेळके, ओंकार बसवंती, दत्तात्रय पाटील, अमित वाळके, रोहित देवमारे, धनंजय खांडेकर आदी पूरग्रस्तांना मदत वाटप करण्यासाठी कोल्हापूरमध्ये तळ ठोकून आहेत
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments