राष्ट्रवादी सोडलेल्या नेत्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठीच मी पंढरपूरात आली आहे : रूपालीताई चाकणकर

राष्ट्रवादीत नेत्यांची कमी नाही.



पंढरपूर (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेते बनवणारा पक्ष असून राष्ट्रवादी पक्षात नेत्यांची कमी नाही. राष्ट्रवादी सोडलेल्या नेत्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठीच मी पंढरपूरात आली आहे. असे घणाघाती वक्तव्य राष्ट्रवादीच्या नूतन महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी केले. त्या पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होत्या.




 यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष  युवराज पाटील, शहराध्यक्ष सुधीर भोसले, तालुकाध्यक्ष दीपक पवार, युवक शहराध्यक्ष संदीप मांडवे, साधना राऊत, रंजना हजारे, अनिता पवार, सुवर्णा बागल, चारुशीला कुलकर्णी आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते.



 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेत्यांची कमतरता नाही ,हा पक्ष नेते बनवणारा पक्ष आहे. यामुळेच महिला प्रदेशाध्यक्षपद रिकामे होताच ,अवघ्या बारा तासात आपली निवड झाल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षास सोडचिठ्ठी देऊन भाजप मध्ये प्रवेश केला होता. त्या दोन दिवसापूर्वी पंढरीत आल्या होत्या .यानंतर अवघ्या दोन दिवसात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पंढरपुरास भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेच्या कुटुंबास भेट दिली. या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी करण्याची विनंती पोलीस निरीक्षक गावडे यांना केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर कडाडून टीका केली.




महिलांना सुरक्षा देण्यात भाजपा सरकार अपयशी




सत्ताधारी भाजप सेनेच्या सरकारचे मुख्यमंत्री, गृहमंत्री पद सांभाळत असून त्यांच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार, बलात्कार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांशी संबंधित महापौरांसारखी बडी नेते मंडळी गुंतली आहे. आणि अशा गुन्हेगारांची पाठराखण भाजप सरकार करीत आहे. यामुळे महिला सबलीकरणाचा डांगोरा पिटणारे हे सरकार महिलांना सुरक्षा पुरवण्यात अयशस्वी ठरले आहे. यामुळे या सरकारचे गृहमंत्रीपद सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी रूपाली चाकणकर यांनी केली आहे.



पंढरपुरात घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबावर गुन्हा मागे घेण्यासाठी राजकीय दबाव आणला जात आहे.यामध्ये सत्ताधारी शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी सामील असल्याचा आरोप रूपाली चाकणकर यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत करून खळबळ उडवून दिली आहे.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments