पंढरपूर
: ‘आपण प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे केल्यास आपल्या हातून देशसेवा होवून
देशाच्या विकासात भर घातली जाईल. देशाच्या विकासासाठी प्रत्येक घटक हा महत्वाचा
असून त्यांनी बजावलेले कर्तव्य महत्वाचे आहे. देशाच्या सीमेवर सैनिक प्रामाणिकपणे
कर्तव्य बजावतात. आपण देशांतर्गत सुरक्षा ठेवली पाहिजे.’ असे प्रतिपादन प्राचार्य
डॉ. अशोक भोईटे यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर
भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात ७३ व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात ते
उपस्थितांना संबोधित करत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी बीएसएफचे गडचिरोली येथील
जवान प्रभाकर शिंदे व आर्मी सैनिक भीमाशंकर एजगर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन
करण्यात आले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
चार्य डॉ. अशोक भोईटे पुढे म्हणाले की, “राष्ट्र ही संकल्पना फार मोठी असून त्याची व्यापकता आपण समजून घेतली पाहिजे. आपणास मिळालेल्या स्वातंत्र्याचा लाभ देशातील शेवटच्या घटकाला मिळाला पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे. विद्यार्थी दशेपासूनच व्यक्तीमध्ये देशप्रेम व राष्ट्रनिष्ठा जागृत झाली पाहिजे. देशामध्ये आंतर्गत असणारी विषमता नष्ट करुन देश एकसंघ होणे आवश्यक आहे.” कार्यक्रमात ३८ महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटनी संचालन केले. या कार्यक्रमानिमित्त महाविद्यालयातील आविष्कार, अर्थमंच, युरेका, आर्थिक जगत आदी भित्तीपत्रकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एनसीसीविभागप्रमुखडॉ. समाधान माने व प्रा. डॉ. नितीन सोहनी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सिनिअर, ज्युनिअर, व्यवसाय अभ्यासक्रम, बी. व्होक आदी विभागाचे शिक्षक, शिक्षकेतर सेवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments