पंढरपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पाच नराधमांनी 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
बलात्काराच्या या घटनेमुळे संपूर्ण पंढरपूर हादरलं आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलीला मद्य पाजून तिच्यावर 5 नराधमांनी बलात्कार केला. आणि बलात्काराचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 आरोपींपैकी पीडित तरुणी एकाची मैत्रिण होती. त्याने तिला एका अज्ञात स्थळी सुलभ शौचालयाजवळ बोलावलं. त्यानंतर पाचही आरोपींकडून तिच्यावर बलात्कारासाठी दबाव टाकण्यात आला. यातील एका आरोपीने तिला छेडलं तर दुसऱ्याने तिला दारू पाजली. त्यानंतर चौघांनी तिच्यावर बलात्कार केला. यात 5 व्या मुलाने सगळ्या प्रकरणाचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर अपलोड करू अशी धमकी आरोपींकडून देण्यात आली.
पीडित तरुणीच्या घरच्यांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलं असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर एकाचा शोध सुरू आहे. या सगळ्या प्रकारामुळे पंढरपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तर संपूर्ण नागरिकांमध्ये आणि तरुणांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
बलात्काराचा व्हिडिओ शेअर होईल या भीतीमुळे पीडितेने ही घटना कोणालाही सांगितली नाही. याचाच फायदा घेत तरुणांनी तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. तिच्याकडे पैशांची मागणीदेखील करण्यात आली. काही दिवसांनी पीडित तरुणीच्या घरी तिच्या वागण्यात फरक जाणवू लागला आणि त्यानंतर तिच्या आईने विचारलं असता या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. या प्रकरणात आता पंढरपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
सामूहिक बलात्कार प्रकरणी 5 आरोपींची नावं :-
मनोज माने , साहिल सुधीर अभंगराव , अक्षय दिलीप कोळी , आरिफ शेख , माऊली तुकाराम अंकुशराव
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments