पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग मधील विद्यार्थ्यांसाठी डाॅ. अविनाश सावजी यांचे व्याख्यान
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी डाॅ. अविनाश सावजी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरवात डाॅ. अविनाश सावजी, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, पालवी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष मंगलताई शहा, डाॅ. वंदना पाटील, अकॅडमी डीन डाॅ. रविंद्र व्यवहारे सर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यादरम्यान डाॅ. अविनाश सावजी यांचा महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सर यांच्या हस्ते तर मंगलताई शहा यांचा प्रा. सुरवसे मॅडम यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सिंहगड काॅलेज मधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डाॅ. अविनाश सावजी म्हणाले, शैक्षणिक जीवनात विद्यार्थ्यांनी नवीन काहीतरी शिकण्याची जिद्द मनात ठेवली पाहिजे, आयुष्य आनंदाने जगण्यासाठी वाचन आवश्यक आहे.
इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा किंवा नामांकित कंपनी नोकरी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांकडे कोणते गुण आवश्यक आहेत. या गुणांनी तुमची निवड केली जाते. आयुष्यात प्रयोग करायला शिकले पाहिजे. आयुष्यात अडचणी खुप येत असतात अशा अडचणी वर हार न मानता लढत राहायचं.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
जीवनात काय करीत असला आणि लोक तुम्हाला हसत किंवा नावे ठेवत असतील तर तुम्ही योग्य दिशेने चालला आहात हे लक्षात ठेवा. प्रयत्न करीत राहा तुम्ही आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल असे मत डाॅ. अविनाश सावजी यांनी पंढरपूर सिंहगड मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सुर्यकांत पाटील यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments