श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या वेगाने राजकीय हालचाली होताना दिसत आहेत. दहशतवादी हल्ल्याची शक्यता आणि नियंत्रण रेषेवर वाढता तणाव यामुळे काश्मीर खोऱ्यात महत्वाच्या तसेच संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. जम्मूमध्ये सकाळी कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. आज जम्मूतील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आले आहेत तसेच काश्मीर खोऱ्यात इंटरनेट, मोबाइल सेवाही बंद करण्यात आली आहे. सकाळी ९.३० वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. ही बैठक संपली असून गृहमंत्री अमित शहा बैठकीतून बाहेर पडले आहेत. या बैठकीनंतर आता मोदी सरकार काश्मीर संदर्भात मोठा निर्णय झाला आहे. राज्यसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी एक मोठी घोषणा केली आहे. जम्मू काश्मीरमधील कलम ३७० कलम अंशत: रद्द करण्याचा प्रस्ताव अमित शहा यांनी सादर केला आहे. काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत सादर करण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं की, कलम ३७० मधील सर्व खंड लागू होणार नाहीत. राष्ट्रपतींच्या मंजूरीनंतर कलम ३७० मधील काही खंड लागू होणार नाहीत.
काश्मीर संदर्भातील क्षणोक्षणाचे LIVE UPDATES
- जे विरोध करत आहेत त्यांनी राजकीय भूमिका बाजुला ठेवावी, हा निर्णय देशहितासाठी त्यामुळे त्याचं सर्वांनी स्वागत करावं - उद्धव ठाकरे
- आजही आपल्या देशात पोलादीपणा कायम आहे आणि त्याचा मला अभिमान आहे - उद्धव ठाकरे
- आज खऱ्या अर्थाने आपला देश पूर्णपणे स्वतंत्र झाला - उद्धव ठाकरे
- पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचं अभिनंदन - उद्धव ठाकरे
- शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटलजी आणि सर्वांचंच स्वप्न आज पूर्ण झालं - उद्धव ठाकरे
- उद्धव ठाकरेंची मुंबईत पत्रकार परिषद
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्र्यांचं अभिनंदन - संजय राऊत
- सरकार कसं चालतं हे मोदी सरकारने दाखवलं आहे - संजय राऊत
- ज्यांनी गेली ७० वर्षे जनतेचं शोषण केलं तेच कलम ३७० हटवण्यास विरोध करत आहेत - संजय राऊत
- सर्वांना विचारात घेऊन सरकारने पावलं उचलली असती तर अधिक चांगलं झालं असतं - शरद पवार
- मोदी सराकारने घेतलेल्या या निर्णयानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन सरकारचं अभिनंदन केलं
- मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाचं विविध राजकीय नेत्यांकडून स्वागत
- पीडीपी खासदार संसदेत आक्रमक, पीडीपीचे राज्यसभा खासदार नाझीर अहमद लवे आणि एमएम फैयाज यांनी संसदेच्या परिसरात सरकारच्या निर्णयाचा विरोध करत प्रदर्शन केलं. गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत सादर केलेल्या प्रस्तावानंतर पीडीपीच्या खासदारांनी संविधानाच्या प्रती फाडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांना सदनातून बाहेर काढण्यात आलं. खासदार एमएम फैयाज यांनी सरकारचा विरोध करत आपला कुर्ता फाडला
- काश्मीर संदर्भातील मोदी सरकारच्या प्रस्तावाला बसपाचा पाठिंबा, मोदी सरकारच्या काश्मीर संदर्भातील प्रस्तावाला बहुजन समाजवादी पक्ष (बसपा) ने समर्थन दिलं आहे. बसपा खासदार सतीश चंद्र मिश्रा यांनी म्हटलं, आमचा पक्ष या प्रस्तावाला संपूर्ण समर्थन देत आहे. हा प्रस्ताव मंजूर व्हावा असं आम्हाला वाटतं. आमचा पक्ष कलम ३७० हटवण्याच्या संदर्भातील प्रस्तावाला कुठल्याही प्रकारे विरोध करणार नाही
- नव्या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर मतदान होणार
- काश्मीरची कलम ३७० मधून सुटका होणार
- लडाख विधीमंडळाशिवाय केंद्रशासित प्रदेश असणार
- जम्मू-काश्मीर सुद्धा केंद्रशासित प्रदेश

- लडाख केंद्रशासित प्रदेश होणार
- लडाख काश्मीरपासून वेगळं होणार
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
- काश्मीरचा विशेष दर्जा संपणार
- काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं की, कलम ३७० मधील सर्व खंड लागू होणार नाहीत. राष्ट्रपतींच्या मंजूरीनंतर कलम ३७० मधील काही खंड लागू होणार नाहीत.
- अमित शहा यांच्या घोषणेनंतर राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ
- जम्मू-काश्मीरच्या द्विभाजनाचा प्रस्ताव
- जम्मू-काश्मीरच्या पूर्नरचनेचाही प्रस्ताव
- संसदेत अमित शहांची मोठी घोषणा, काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याची शिफारस
- मोदी सरकारने घेतला मोठा ऐतिहासिक निर्णय
- कलम ३७० मधील काहीच तरतुदी लागू होणार - अमित शहा
- कलम ३७० मधील काही कलम वगळणार - अमित शहा
- प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार - अमित शहा
- काश्मीर प्रश्नावर राज्यसभेत अमित शहा यांचं निवेदन
- पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत पोहोचले.
- देशाच्या हितासाठी जो निर्णय होईल त्या निर्णयासाठी आम्ही सरकारसोबत उभे राहू - शिवसेना खासदार संजय राऊत
- काश्मीर प्रश्नावर झालेली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपल्यावर गृहमंत्री अमित शहा संसदेत पोहोचले
- केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली
________________________________________________________________________________
Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
________________________________________________________________________________








0 Comments