पंढरपूर: पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय व यशवंत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरामध्ये कर्मवीर प्रतिमा भव्य मिरवणूक रविवार दि. २२ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांच्या हस्ते कर्मवीर प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जनरल बॉडी सदस्य डॉ. राजेंद्र जाधव, यशवंत विद्यालय मुख्याध्यापक श्री.एस. एस. शेवाळे ,माजी विद्यार्थी अनिल पवार,नागेश भोसले,किशोर मोळक,संजय शहा,उपप्राचार्य प्रा. बी. जे. तोडकरी,डॉ. एन. एन. तंटक, प्रा.चंदनशिवे, सांकृतिक विभाग प्रमुख डॉ. विकास कदम, समारंभ समिती प्रमुख डॉ. एच. एम. लोंढे, कार्यालयीन प्रमुख श्री. अनंता जाधव, नगरसेवक मा. बाळासाहेब नेहतराव व शिक्षक-शिक्षकेत्तर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, रयत शिक्षण संस्थेचा विजय असो, ज्ञानाचा दिवा घरो घरी लावा, कर्मवीर अण्णाचा विजय असो !. अशा अनेक घोषणांनी पंढरपूर नगरी दुमदुमली. कर्मवीररथाने मिरवणुकीची शोभा वाढवली. डॉ. अमर कांबळे, प्रा. आर. एस. पवार, प्रा. के. पी. गायकवाड, प्रा. आर. एस. पवार, ए. एम. मोरे मॅडम यांनी निवेदनातून अण्णांच्या सामाजिक व शैक्षणिक जीवनकार्याचा परिचय करून दिला.
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
स्टेशन,द.ह.कवठेकर प्रशाला मार्गे महाविद्यालयात आली. या आनंद सोहळ्यात पंढरपूर परिसरातील अनेक रयतप्रेमी मान्यवरांनी सहभागी होऊन प्रतिमेला पुष्पहार घालून कर्मवीर अण्णांना अभिवादन केले. पंढरपूर पोलीस यांच्या सहकार्याने ही मिरवणूक सुरक्षित पार पडली. डॉ. समाधान शिंदे आणि त्यांचे सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील ५० विद्यार्थी आणि ३० विद्यार्थिनीनी अनेक चौकात झांजपथकाच्या विविध कला सादर केल्या. वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, पंढरपूर यांनी मिरवणुकीतील विद्यार्थ्यांना खाऊ व पाणी वाटप केले. या शोभायात्रेत राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, महाविद्यालय व यशवंत विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक- शिक्षकेत्तर सेवक सहभागी होते. विद्यार्थी व सेवकांना अल्पोहार देऊन महाविद्यालयात मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________





0 Comments