पुणे-सकल जैन संघ, पुणे ह्यांच्या सौजन्याने व आचार्य सम्राट, परमपुज्य, डॉ.शिवमुनीजी म.सा. यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वर्धमान सांस्कृतिक भवन, गंगाधाम कोंडवा रोड, येथे भारत विकास परिषद, स्वारगेट शाखा, आनंद अचल गुरु फाउंडेशन, सौ सुशीलाबेन मोतीलाल शहा चॅरिटेबल ट्रस्ट व लायन्स क्लब ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरातील पहिलेच 350 चे दिव्यांगांचे मोफत शिबिर यशस्वीरित्या सम्पन्न झाले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
यावेळी आचार्य राष्ट्रसंत सम्राट डॉ.शिवमुनींजी म्हणाले की दिव्यांगासाठी मदत करणे म्हणजे ही एक उत्तम मानव सेवा होय. पैसा कमवून जो आनंद घेऊ शकत नाही तो आनंद दिव्यंगाची सेवा केल्याने सहज मिळतो,सोबत आत्मिक समाधानाने माणसाचे आयुष्य वाढते असेही शिवमुनींजी पुढे बोलले.ह्या शिबिरात प्रामुख्याने दिव्यांगांसाठी, ज्याला उभे राहता येत नाही, त्याला उभे करणे, ज्याला चालता येत नाही, त्याला पाय देऊन चालवणे व ज्याला पळता येत नाही, त्याला ट्रायसिकल, व्हीलचेअर देऊन गतिमान करणे हा उद्देश ठेवल्याने चतुर्मासातील सर्व कार्यक्रमापेक्षा दिव्यांग शिबीर खऱ्या अर्थाने सार्थक झाल्याने विविध राज्यातील जैन समाजासोबत पुणेकरांनी देखील या शिबिराचे कौतुक केले.
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
5 ते 15 वर्ष वयोगटातील 200 दिव्यांगांची तपासणी करून 122 मुलाची शस्त्रक्रिया करणेसाठी निवड केली. कृत्रिम हात व पाय - विकास फूट शिबिर मध्ये 44 लोकांनी सहभाग घेऊन त्यातील 36 जणांची निवड करून त्यांना लवकरच जयपूर पाय आणि हात देणार आहोत. तसेच 14 ट्रायसिकल, 12 व्हीलचेअर चे यावेळी मोफत वाटप देखील केले.ह्या कार्यक्रमातच लायन्स क्लब पुणे - मनस्वी, डिजिटल, प्राईम, सुप्रीम व नवचैतन्य यांच्यातर्फे 150 दिव्यांगांची नेत्रचिकित्सा, डायबिटीस चाचणी व कॅन्सर तपासणीही केली गेली.
या कार्यक्रमास आचार्य डॉ. शिवमुनीजी महाराज, आचार्य श्री देव चंद्र सुरेश्वरजी म.सा. श्री अचल ऋषीजी महाराज आणि आय.जी.आयरन मॅन कृष्णकुमार जी आवर्जून उपस्थित होते. तसेच सकल जैन संघाचे श्री विजयकांतजी कोठारी, राजेशजी सांकला, विजयजी भंडारी, सौ.सुरेखा व लखिचंद खींवसरा तसेच जैन कॉन्फरन्स, नवी दिल्लीचे अध्यक्ष श्री पारसजी मोदी, उपाध्यक्ष अशोकजी पगारिया व त्यांची पूर्ण टीम तसेच महिला अध्यक्ष सौ विमल बाफना जैन, जिल्हा परिषद सी.ई.ओ. श्री जाधव साहेब, संजय चोरडिया, सुभाष बाबू लुंकड आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भारत विकास परिषदेतर्फे अध्यक्ष दीपक गुंदेचा, प्रांतीय अध्यक्ष अनिरुद्ध तोडकर, विकलांग केंद्राचे, श्री विनय खटावकर, जयंत जेस्ते,प्रवीण दोशी, सौ सुशिलाबेन व मोतीलालजी शहा,सौ रेखा व प्रवीणजी जैन, फुले साहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन चे अध्यक्ष रघुनाथ ढोक,अतुल सलाग्रे, वासुदेव केंच, मदनलाल दर्डा, आनंद अचल गुरु फाउंडेशनचे अध्यक्ष श्री कुंदन दर्डा, अभय दर्डा, विलास राठोड, वि. टी पालरेषा, डॉक्टर रानडे, लायन्स क्लब तर्फे भाग्यश्री चौंडे, श्रीराम भालेराव व त्यांच्या पूर्ण टीमने परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन सीए ऐश्वर्या गुंदेचा आणि विलास राठोड यांनी केले.तर आभार जेष्ठ समाजसेविका सौ.सुशीलाबेन शहा यांनी मानले. यावेळी अनके बांधवानी देणगी जाहीर करून मोठी मदत केली परंतु या कामासाठी मोठया निधीची,दानसुर लोकांची गरज असल्याचे माहिती दीपक गुंदेचा यांनी दिली.या वेळी प्रचंड जैन समाज व इतर मान्यवर मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
0 Comments