दि. 9 सप्टेंबर 2019 रोजी प्रज्वला योजने अंतर्गत राज्य महिला आयोगाच्या वतीने श्रीराम मंगलधाम, पंढरपूर येथे कायदेविषयक जनजागृती व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी श्रीमती विजया रहाटकर (अध्यक्षा-राज्य महिला आयोग, मुंबई) यांनी केंद्र व राज्य शासनाच्या महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन केले व कायदेविषयक माहितींच्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. तसेच प्रज्वला योजनेबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. तालुक्यातील बचत गटाच्या उल्लेखनीय कामकाजाबाबत गौरोद्गार काढले व पंढरपूर तालुक्याचे अभिनंदन केले.
अॅड. वर्षा ढाळे यांनी कौटुंबिक हिंसाचार यावर मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत दिल्या जाणार्या शुन्य टक्के व्याजदराची माहिती देऊन महिलांना रोजच्या दैनंदिन जीवनामधील अडचणींना कायदेशीरदृष्ट्या कसे सामोरे जावे, याविषयी मार्गदर्शन केले. श्रीमती उमाताई खापरे यांनी वेगवेगळ्या शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन करुन जास्तीतजास्त महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले, पंचायत समिती सभापती राजेंद्र पाटील यांनी महिला बचत गटाच्या चळवळीला शुभेच्छा दिल्या.
गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पंढरपूर तालुक्यात स्थापन झालेल्या बचत गट, विविध प्रशिक्षणे, फिरता निधी, बँक अर्थसहाय्य, युवक युवतींसाठी असलेली प्रशिक्षणे आदी माहिती दिली. सदर कार्यक्रमासाठी तालुक्यातील बचत गट, विविध प्रशिक्षणे, फिरता निधी, बँक अर्थसहाय्य, युवक युवतींसाठी असलेली प्रशिक्षणे आदी माहिती दिली.
सदर कार्यक्रमासाठी तालुक्यातील बचत गटातील महिलांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती विद्या शिंदे यांनी केले तर आभार योगेश जगताप यांनी मानले.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________







0 Comments