पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (तालुका पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग महाविद्यालयात महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना व सिंहगड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख, डॉ. संभाजी पाचकवडे, डॉ. प्रसाद खाडिलकर, प्रा. गुरुराज इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
पंढरपूर ब्लड बँक यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी पंढरपूर ब्लड बँकेकडून रक्तदात्यांना बक्षीस देण्यात आले.
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरांमध्ये २०० हुन अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विविध सामाजिक उपक्रम घेत असतात. त्याच एक भाग म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments